44. अड-दुखान
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1१. हा. मीम
2२. शपथ आहे या स्पष्ट ग्रंथाची
3३. निःसंशय, आम्ही या ग्रंथाला एका शुभरात्रीत१ अवतरित केले आहे. निःसंशय, आम्ही अवगत करून देणारे आहोत
4४. त्याच रात्रीत प्रत्येक महत्त्वपूर्ण कार्याचा निर्णय घेतला जातो
5५. आमच्याकडून एक फर्मान बनून आम्हीच आहोत रसूल (संदेशवाहक) बनवून पाठविणारे
6६. तुमच्या पालनकर्त्याच्या कृपेने, तोच आहे ऐकणारा आणि जाणणारा
7७. जो आकाशांचा आणि धरतीचा आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे त्या सर्वांचा स्वामी आहे, जर तुम्ही विश्वास राखणारे असाल
8८. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही उपासना करण्यास पात्र नाही. तोच जिवंत करतो आणि मारतो. तोच तुमचा आणि तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या पूर्वजांचा स्वामी व पालनकर्ता आहे
9९. किंबहुना ते संशयात पडून खेळत आहेत
10१०. तुम्ही त्या दिवसाच्या प्रतीक्षेत राहा, जेव्हा आकाश उघड स्वरूपाचा धूर आणील
11११. जो लोकांना घेरा टाकील. ही मोठी दुःखदायक शिक्षा - यातना आहे
12१२. (म्हणतील की) हे आमच्या पालनकर्त्या! हा अज़ाब (शिक्षा - यातना) आमच्यापासून दूर कर, आम्ही ईमान स्वीकारले
13१३. त्यांच्यासाठी आता उपदेश कोठे आहे? स्पष्टरित्या निवेदन करणारे पैगंबर त्यांच्याजवळ (केव्हाच) येऊन गेलेत
14१४. तरीही त्यांनी त्यांच्याकडून तोंड फिरविले आणि सांगितले की हा तर शिकविलेला वेडा आहे
15१५. आम्ही शिक्षा - यातनेला थोडेसे दूरही करू तरी तुम्ही परत पुन्हा आपल्या त्याच अवस्थेत याल
16१६. ज्या दिवशी आम्ही मोठ्या सक्त पकडीत धरू, निश्चितच आम्ही प्रतिशोध (सूड) घेणार आहोत
17१७. आणि निःसंशय, आम्ही यापूर्वी फिरऔनच्या जनसमूहाची (ही) परीक्षा घेतली आहे ज्यांच्याजवळ (अल्लाहचा) प्रतिष्ठासंपन्न रसूल (पैगंबर) आला
18१८. की अल्लाहच्या दासांना माझ्या हवाली करा, विश्वास राखा की मी तुमच्यासाठी विश्वस्त पैगंबर आहे
19१९. आणि तुम्ही अल्लाहसमोर विद्रोह दाखवू नका. मी तुमच्यासमोर उघड पुरावा प्रस्तुत करेन
20२०. आणि मी, आपल्या व तुमच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो. या गोष्टीपासून की तुम्ही मला दगडांनी ठेचून मारावे
21२१. आणि जर तुम्ही माझ्यावर ईमान राखत नसाल तर माझ्यापासून अलग राहा
22२२. मग त्यांनी आपल्या पालनकर्त्याला दुआ-प्रार्थना केली की हे सर्व अपराधी लोक आहेत
23२३. (आम्ही फर्माविले) की रात्रीतूनच तुम्ही माझ्या दासांना घेऊन निघा. निश्चितच तुमचा पाठलाग केला जाईल
24२४. आणि तुम्ही समुद्राला स्थिर अवस्थेत सोडून निघून जा. निःसंशय, हे सैन्य बुडविले जाईल
25२५. ते अनेक बागा आणि झरे सोडून गेले
26२६. आणि शेते व उत्तम निवासस्थाने
27२७. आणि त्या सुखदायक वस्तू ज्यांच्यात ते सुख भोगत होते
28२८. अशा प्रकारे घडले, आणि आम्ही त्या सर्वांचा उत्तराधिकारी (वारस) दुसऱ्या जनसमूहाला बनविले
29२९. तेव्हा त्यांच्यासाठी ना आकाश रडले ना धरती आणि ना त्यांना कसली संधी लाभली
30३०. आणि आम्हीच इस्राईलच्या संततीला (अतिशय) अपमानदायक शिक्षा-यातनेपासून मुक्ती दिली
31३१. (जी) फिरऔनतर्फे (दिली जात) होती. वास्तविक तो विद्रोही आणि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांपैकी होता
32३२. आणि आम्ही जाणूनबुजून इस्राईलच्या संततीला जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली
33३३. आणि आम्ही त्यांना अशा निशाण्या प्रदान केल्या, ज्यांच्यात उघड कसोटी होती
34३४. हे लोक तर हेच म्हणतात
35३५. की (अंतिम गोष्ट) हेच आमचे पहिल्यांदा (जगात) मरण पावणे आहे आणि आम्ही दुसऱ्यांदा उठविलो जाणार नाहीत
36३६. जर तुम्ही सच्चे असाल तर आमच्या पूर्वजांना घेऊन या
37३७. काय हे लोक अधिक चांगले आहेत की तुब्बअ च्या जनसमूहाचे लोक आणि जे त्यांच्याही पूर्वीचे होते? आम्ही त्या सर्वांना नष्ट करून टाकले. निःसंशय, ते अपराधी होते
38३८. आणि आम्ही आकाशांना व धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या वस्तूंना खेळ स्वरूपात निर्माण केले नाही
39३९. किंबहुना आम्ही त्यांना उचित हेतुसहच निर्माण केले आहे. परंतु अधिकांश लोक हे जाणत नाहीत
40४०. निःसंशय, निर्णयाचा दिवस त्या सर्वांसाठी निर्धारित वेळी आहे
41४१. त्या दिवशी कोणी मित्र कोणा मित्राच्या काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांची मदत केली जाईल
42४२. परंतु (त्याच्याखेरीज) ज्याच्यावर अल्लाहची दया - कृपा व्हावी. निःसंशय, तो मोठा शक्तिशाली आणि दया करणारा आहे
43४३. निःसंशय, जक्कूमचे झाड
44४४. गुन्हेगारांचे भोजन आहे
45४५. जे वितळलेल्या तांब्यासारखे आहे आणि पोटात उकळत राहते
46४६. खूप गरम उकळत्या पाण्यासारखे
47४७. त्याला धरा, मग फरफटत ओढत नेऊन जहन्नमच्या मध्यभागी पोहचवा
48४८. मग त्याच्या डोक्यावर गरम उकळत्या पाण्याची यातना (अज़ाब) ओता
49४९. (त्याला सांगितले जाईल) चाखत जा (गोडी), तू तर मोठा प्रतिष्ठित आणि आदरसन्मान बाळगणारा होता
50५०. हीच ती गोष्ट होय, जिच्याबाबत तुम्ही शंका करीत असत
51५१. निःसंशय, अल्लाहचे भय बाळगणारे शांतीपूर्ण ठिकाणी असतील
52५२. बागांमध्ये आणि जलस्रोतां (झऱ्यां) मध्ये
53५३. पातळ व मुलायम रेशमी वस्त्रे घातलेले, समोरासमोर बसले असतील
54५४. हे त्याच प्रकारे आहे, आणि आम्ही मोठया नेत्रांच्या हूर-परींशी त्यांचा विवाह करून देऊ
55५५. निर्भयतापूर्वक तिथे प्रत्येक प्रकारच्या मेव्याची मागणी करतील
56५६. तिथे ते मृत्युचा स्वाद चाखणार नाहीत, पहिल्या मृत्युखेरीज (जो जगात घडला) त्यांना अल्लाहने जहन्नमच्या (भयंकर) शिक्षा - यातने (अज़ाब) पासून वाचविले
57५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी सफलता
58५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी की त्यांनी (लोकांनी) बोध ग्रहण करावा
59५९. आता तुम्ही प्रतीक्षा करा, हे देखील प्रतीक्षा करीत आहेत
स्रोत: Muhammad Shafi I Ansari
WEBREATH · 11:11
«If you are thankful, I will give you more» — Quran 14:7
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath