इस्लाम
मागे

75. अल-कियामा

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1१. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची

2२. आणि मी शपथ घेतो, धिःक्कार करणाऱ्या मना (आत्म्या) ची

3३. काय मनुष्य असा विचार करतो की आम्ही त्याची हाडे एकत्र करणारच नाहीत

4४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे

5५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे

6६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल

7७. तर जेव्हा डोळे जडवत होतील

8८. आणि चंद्र निस्तेज होईल

9९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील

10१०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे

11११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही

12१२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे

13१३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल

14१४. किंबहुना मनुष्य स्वतःच स्वतःवर प्रमाण आहे

15१५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी

16१६. (हे पैगंबर!) तुम्ही कुरआनास त्वरित तोंडी पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला (घाईने) हलवू नका

17१७. त्यास एकत्र करणे आणि (तुमच्या तोंडून) पठण करविणे आमची जबाबदारी आहे

18१८. (यास्तव) आम्ही जेव्हा त्याचे पठण संपवू तेव्हा तुम्ही त्याच्या पठणाचे अनुसरण करा

19१९. त्यास स्पष्ट करणे आमचे काम आहे

20२०. नव्हे, तुम्ही तर लवकर प्राप्त होणाऱ्या (जगा) शी प्रेम राखता

21२१. आणि आखिरतला सोडून बसला आहात

22२२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील

23२३. आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील

24२४. आणि कित्येक चेहरे त्या दिवशी (कुरुप आणि) उदास असतील

25२५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल

26२६. नाही नाही जेव्हा (प्राण) कंठाशी पोहचतील

27२७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे

28२८. आणि त्याने खात्री केली की ही वियोगाची वेळ आहे

29२९. आणि पोटरीशी पोटरी बिलगेल

30३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे

31३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली

32३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला

33३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला

34३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर

35३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी

36३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल

37३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो

38३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले

39३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले

40४०. काय (अल्लाह) या गोष्टी समर्थ नाही की मेलेल्यास जिवंत करावं

स्रोत: Muhammad Shafi I Ansari

WEBREATH · 11:11

«If you are thankful, I will give you more» — Quran 14:7

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath