इस्लाम
मागे

72. अल-जिन

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1१. (हे मुहम्मद स.) तुम्ही सांगा की मला वहयी (प्रकाशना) केली गेली आहे की जिन्नांच्या एका समूहाने (कुरआन) ऐकले आणि म्हटले की आम्ही मोठे आश्चर्यकारक कुरआन ऐकले आहे

2२. जो सत्य मार्ग दाखवितो आम्ही तर त्यावर ईमान राखले, (आता) आम्ही कधीही आपल्या पालनकर्त्याचा दुसऱ्या एखाद्याला सहभागी बनविणार नाही

3३. आणि निःसंशय, आमच्या पालनकर्त्याची शान (महानता) अति उच्च आहे, त्याने ना कोणाला (आपली) पत्नी बनविले आहे आणि ना संतती

4४. आणि निःसंशय, आमच्यातला मूर्ख, अल्लाहविषयी खोट्या गोष्टी बोलत होता

5५. आणि आम्ही तर हेच समजत राहिलो की मनुष्य आणि जिन्न अल्लाहविषयी कधीही खोटे बोलणार नाहीत

6६. वस्तुतः काही माणसे, काही जिन्नांकडे शरण मागत होते, ज्यामुळे जिन्नांच्या उदंडतेत अधिकच भर पडली

7७. आणि (मानवां) नी देखील जिन्नांप्रमाणे हे गृहीत धरले होते की अल्लाह कधीही कोणाला पाठविणार नाही (किंवा कोणाला दुसऱ्यांदा जिवंत करणार नाही)

8८. आणि आम्ही आकाशाचे निरीक्षण करून पाहिले तेव्हा ते सक्त पहारेकऱ्यांनी आणि प्रखर अग्नि-शिखांनी (ज्वालांनी) भरलेले आढळले

9९. आणि याच्यापूर्वी आम्ही गोष्टी (बोलणे) ऐकण्याकरिता आकाशात ठिकठिकाणी बसत असू, आता जो देखील कान लावतो, त्याला एक ज्वाला आपल्यावर टपून असल्याचे आढळते

10१०. आणि आम्ही नाही जाणत की धरतीवर राहणाऱ्यांशी एखाद्या वाईट गोष्टीचा इरादा केला गेला आहे की त्यांच्या पालनकर्त्याचा इरादा त्यांच्याशी भलाईचा आहे

11११. आणि हे की (निःसंशय) आमच्यापैकी काही तर नेक सदाचारी आहेत आणि काही त्याच्या विपरीत आहेत. आम्ही अनेक प्रकारे विभागलेलो आहोत

12१२. आणि आम्हाला (आता) पूर्ण खात्री झाली की आम्ही अल्लाहला धरतीत कधीही विवश करू शकत नाही आणि ना आम्ही पळून जाऊन त्याला परास्त करू शकतो

13१३. आणि आम्ही मार्गदर्शनाची गोष्ट ऐकताच तिच्यावर ईमान राखले आणि जो देखील आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखेल, त्याला ना एखाद्या हानीचे भय आहे ना अत्याचारा (व दुःखा) चे

14१४. आणि आमच्यापैकी काही मुस्लिम आहेत तर काही अन्यायी आहे, तेव्हा जे मुस्लिम झाले, त्यांनी सन्मार्ग शोधून घेतला

15१५. आणि जे अत्याचारी आहेत, ते जहन्नमचे इंधन बनले

16१६. आणि हे की जर हे लोक सरळ मार्गावर दृढपणे राहिले असते, तर अवश्य आम्ही त्यांना भरपूर पाणी पाजले असते

17१७. यासाठी की आम्ही यात त्यांची परीक्षा घ्यावी आणि जो मनुष्य आपल्या पालनकर्त्याच्या स्मरणापासून तोंड फिरविल, तर अल्लाह त्याला कठोर शिक्षा - यातनेत टाकील

18१८. आणि हे की मस्जिद केवळ अल्लाहच्याचकरिता (खास) आहेत. तेव्हा अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला पुकारु नका.१

19१९. आणि जेव्हा अल्लाहचा दास (उपासक) त्याच्या उपासनेसाठी उभा राहिला तेव्हा निकट होते की ते जमावाजमावाने त्याच्यावर तुटून पडावेत. १

20२०. (तुम्ही) सांगा की, मी तर केवळ आपल्या पालनकर्त्यास पुकारतो आणि त्याच्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी बनवित नाही

21२१. सांगा, मला तुमच्या बाबतीत कसल्याही लाभ-हानीचा अधिकार नाही

22२२. सांगा की मला अल्लाहपासून कधीही कोणी वाचवू शकत नाही, आणि मी कधीही त्याच्याखेरीज एखादे आश्रयस्थान प्राप्त करू शकत नाही

23२३. तथापि (माझे काम) तर केवळ अल्लाहची वाणी आणि त्याचा संदेश (लोकांना) पोहचविणे आहे (आता) जो देखील अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा करील तर त्याच्यासाठी जहन्नमची आग आहे, जिच्यात असे लोक सदैव राहतील

24२४. येथेपर्यंत की, जेव्हा ते तिला पाहून घेतील, जिचा त्यांना वायदा दिला जात आहे, तेव्हा निकट भविष्यात जाणून घेतील की कोणाचा सहाय्यक कमजोर आणि कोणाचा समूह (संख्येने) कमी आहे

25२५. (तुम्ही) सांगा की मला नाही माहीत की ज्या गोष्टीचा वायदा तुमच्याशी केला जात आहे, ती जवळ आहे की माझा पालनकर्ता त्याकरिता लांबची मुदत निर्धारित करील

26२६. तोच परोक्ष ज्ञाता आहे आणि आपल्या परोक्ष (ज्ञाना) ने तो कोणालाही अवगत करवित नाही

27२७. मात्र त्या रसूल (पैगंबरा) खेरीज, ज्याला तो पसंत करील,१ यासाठी की त्याच्याही पुढे - मागे पहारेकरी (संरक्षक) तैनात करतो

28२८. यासाठी की हे कळून घ्यावे की त्यांनी आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहचविलेत. अल्लाहने त्यांच्या निकटच्या गोष्टींना घेरून ठेवले आहे आणि प्रत्येक गोष्टीची गणना करून ठेवली आहे

स्रोत: Muhammad Shafi I Ansari

WEBREATH · 11:11

«If you are thankful, I will give you more» — Quran 14:7

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath