59. अल-हशर
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1१. आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू अल्लाहच्या पवित्रतेसह गुणगान करते आणि तो मोठा वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे
2२. तोच आहे ज्याने ग्रंथधारकांमधल्या काफिरांना त्यांच्या घरातून पहिल्या हश्र (एकत्र होण्याचा) वेळी काढले. तुम्हाला कल्पनाही नव्हती की ते निघतील आणि ते स्वतः समजत होते की त्याचे मजबूत किल्ले त्यांना अल्लाहच्या शिक्षा यातनेपासून वाचवून घेतील. तेव्हा त्यांच्यावर अल्लाह (चा प्रकोप) अशा ठिकाणाहून येऊन कोसळला की त्यांना त्याचे अनुमानही नव्हती आणि त्यांच्या मनात अल्लाहने भय टाकले, ते आपल्या घरांना आपल्याच हातांनी ओसाड करीत होते आणि ईमान राखणाऱ्यांच्या हातून (नष्ट करीत होते) तेव्हा, हे डोळे राखणाऱ्यांनो! बोध ग्रहण करा
3३. आणि जर अल्लाहने त्यांच्यासाठी हद्दपारी लिहिली नसती तर निश्चितच त्यांना या जगातच शिक्षा यातना दिली असती आणि आखिरतमध्ये (तर) त्यांच्यासाठी आगीची शिक्षा आहेच
4४. हे अशासाठी की त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोध केला, आणि जो देखील अल्लाहचा विरोध करील तर अल्लाह देखील मोठी कठोर शिक्षा यातना देणारा आहे
5५. खजुरींची जी झाडे तुम्ही कापून टाकलीत आणि ज्यांना तुम्ही त्यांच्या मुळासकट बाकी राहू दिले तर हे सर्व अल्लाहच्या आदेशाने झाले, आणि यासाठीही की दुराचारी लोकांना अल्लाहने अपमानित करावे
6६. आणि त्यांची जी संपत्ती अल्लाहने आपल्या पैगंबराच्या हाती दिली ज्यासाठी तुम्ही ना घोडे दौडविले आहेत ना ऊंट, किंबहुना अल्लाह आपल्या पैगंबराला, ज्याच्यावर इच्छितो वर्चस्वशाली करतो आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे
7७. वस्त्यावाल्यांचे जे धन अल्लाहने तुमच्या लढण्याविनाच आपल्या पैगंबराच्या हाती दिले, ते अल्लाहचे आहे आणि पैगंबराचे आहे, जवळच्या नातेवाईकांचे, अनाथांचे, गोरगरीबांचे व प्रवाशांचे आहे यासाठी की तुमच्यातल्या धनवानांच्याच हातात हे धन फिरत राहू नये आणि तुम्हाला पैगंबर जे काही देईल ते घ्या आणि ज्यापासून रोखेल त्यापासून अलिप्त राहा आणि अल्लाहचे भय बाळगत राहा. निःसंशय, अल्लाह मोठी सक्त शिक्षा यातना देणारा आहे
8८. हे धन त्या गरीब मुहाजिर लोकां (देशत्याग केलेल्या ईमानधारकां) करिता आहे, ज्यांना आपल्या घरातून आणि आपल्या संपत्तीतून बाहेर काढले गेले आहे. ते अल्लाहची दया कृपा व प्रसन्नता इच्छितात आणि अल्लाहची आणि त्याच्या पैगंबराची मदत करतात. हेच लोक सच्चे आहेत
9९. आणि (त्यांच्याकरिता) ज्यांनी या घरात (अर्थात मदीनेत) आणि ईमान राखण्यात त्यांच्यापूर्वी स्थान बनवून घेतले आणि आपल्याकडे हिजरत (देशत्याग) करून येणाऱ्यांशी प्रेम राखतात आणि देशत्याग केलेल्यां (मुहाजिर लोकां) ना जे काही दिले जाते, त्याबद्दल ते आपल्या छातीत (मनात) कसलाही संकोच करीत नाहीत, उलट स्वतः आपल्यावर त्यांना प्राधान्य देतात, मग ते स्वतः कितीही गरजवंत असोत (खरी गोष्ट अशी की) जो कोणी आपल्या मनाच्या इच्छा अभिलाषांपासून वाचविला गेला, तोच सफलता प्राप्त करणारा आहे.१
10१०. आणि (त्यांच्यासाठी) जे त्यांच्यानंतर आले, जे म्हणतील की, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला माफ कर आणि आमच्या त्या बांधवांनाही, ज्यांनी आमच्या आधी ईमान राखले आहे आणि ईमान राखणाऱ्यांच्याविषयी आमच्या मनात कपट (आणि वैरभावना) आणू नको. हे आमच्या पालनकर्त्या! निःसंशय, तू प्रेम आणि दया करणारा आहे
11११. काय तुम्ही त्या दांभिक (मुनाफिक) लोकांना नाही पाहिले, जे आपल्या ग्रंथ बाळगणाऱ्यांमधील काफिर बांधवांना म्हणतात की जर तुम्हाला देशाबाहेर घालविले गेले तर आम्हीही अवश्य तुमच्यासोबत देशत्याग करू आणि तुमच्याविषयी कधीही कोणाचे म्हणणे मान्य करणार नाही आणि जर तुमच्याशी युद्ध केले केले तर निश्चित आम्ही तुमची मदत करू, परंतु अल्लाह साक्ष देतो की हे अगदी खोटारडे आहेत
12१२. जर त्यांना देशाबाहेर घालविले गेले तर हे त्यांच्यासोबत जाणार नाहीत आणि जर त्यांच्याशी युद्ध छेडले गेले तर हे त्यांची मदतही करणार नाहीत आणि (समजा) हे मदत करण्यास तयारही झालेत तर पाठ दाखवून (पळ काढतील) मग त्यांची मदत केली जाणार नाही
13१३. (मुसलमानांनो! विश्वास करा) की तुमचे भय त्यांच्या छातीत (मनात) अल्लाहच्या भयाच्या तुलनेत फार जास्त आहे, हे यासाठी की ते सुज्ञता बाळगत नाही
14१४. हे सर्व मिळूनही तुमच्याशी लढू शकत नाही, मात्र ही गोष्ट वेगळी की किल्ल्याने घेरलेल्या ठिकाणी असावेत किंवा भिंतींच्या आडोशाला असावेत. त्यांची लढाई तर आपसातच मोठी सक्त आहे. जरी तुम्ही त्यांना एकसंघ समजत आहात तरी, वस्तुतः त्यांची मने आपसात विभक्त आहेत हे अशासाठी की हे निर्बुद्ध लोक आहेत
15१५. त्या लोकांसारखे, जे त्यांच्या थोड्याचपूर्वी होऊन गेलेत, ज्यांनी आपल्या दुष्कर्मांची गोडी चाखली आणि ज्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा (तयार) आहे
16१६. सैतानासारखे की तो माणसाला म्हणतो, कुप्र (इन्कार) कर, मग जेव्हा तो कुप्र करून बसतो, तेव्हा म्हणतो, मी तुझ्यापासून वेगळा आहे. मी तर साऱ्या विश्वांच्या पालनकर्त्यांचे भय बाळगतो
17१७. तेव्हा दोघांचा परिणाम हा झाला की (जहन्नमच्या) आगीत नेहमी नेहमीकरिता गेले आणि अत्याचारी लोकांची हीच शिक्षा आहे
18१८. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहचे भय बाळगत राहा१ आणि प्रत्येक माणसाने हे बघावे की उद्या (कयामतकरिता) त्याने कर्मांचे कोणते (भांडार) पाठविले आहे,२ आणि (प्रत्येक क्षणी) अल्लाहचे भय राखा, अल्लाह तुमच्या समस्त कर्मांशी परिचित आहे
19१९. आणि तुम्ही त्या लोकांसारखे होऊ नका, ज्यांनी अल्लाह (च्या आदेशा) चा विसर पाडला, तेव्हा अल्लाहने त्यांना स्वतःचेच विस्मरण घडविले. असेच लोक दुराचारी असतात
20२०. जहन्नमवाले आणि जन्नतवाले (आपसात) समान नाहीत.३ जे जन्नतवाले आहेत तेच सफल आहेत
21२१. जर आम्ही कुरआनाला एखाद्या पर्वतावर अवतरित केले असते तेव्हा तुम्ही पाहिले असते की अल्लाहच्या भयाने तो झुकून चूर चूर (कण कण) झाला असता. आम्ही ही उदाहरणे लोकांसाठी निवेदित आहोत यासाठी की त्यांनी विचार चिंतन करावे
22२२. तोच अल्लाह आहे, ज्याच्याखेरीज कोणीही उपासनीय (पूज्य) नाही. लपलेल्या व उघड गोष्टी जाणणारा, तोच माफ व दया करणारा
23२३. तोच अल्लाह आहे, ज्याच्याखेरीज कोणी सच्चा माबूद (उपास्य) नाही. मालक (स्वामी) अतिशय पवित्र, सर्व व्यंग दोषांपासून मुक्त शांती (सलामती) प्रदान करणारा, संरक्षक, वर्चस्वशाली, शक्तिशाली, महानतम पवित्र आहे अल्लाह त्या गोष्टींपासून ज्यांना हे त्याचा सहभागी ठरवितात
24२४. तोच अल्लाह आहे निर्माणकर्ता, रचयिता, स्वरूप देणारा, त्याच्याचसाठी (अतिशय) उत्तम नावे आहेत. प्रत्येक वस्तू मग ती आकाशात असो किंवा धरतीत असो, त्याचेच पवित्र वर्णन करते आणि तोच मोठा जबरदस्त आणि बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे
स्रोत: Muhammad Shafi I Ansari
WEBREATH · 11:11
«If you are thankful, I will give you more» — Quran 14:7
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath