प्रकटीकरण 7
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्यांना थोपवून धरीत होते.
2मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला,
3“आम्ही परमेश्वराच्या सेवकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का मारीपर्यंत पृथ्वी, समुद्र किंवा वृक्ष यांना काहीही इजा करू नका.”
4ज्या लोकांवर हा शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली: ते इस्राएलच्या सर्व बारा वंशांमधून 1,44,000 लोक होते.
5यहूदाह वंशातून 12,000; रऊबेन वंशातून 12,000; गाद वंशातून 12,000;
6आशेर वंशातून 12,000; नफताली वंशातून 12,000; मनश्शेह वंशातून 12,000;
7शिमोन वंशातून 12,000; लेवी वंशातून 12,000; इस्साखार वंशातून 12,000;
8जबुलून वंशातून 12,000; योसेफ वंशातून 12,000; बन्यामीन वंशातून 12,000.
9यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते.
10ते प्रचंड आवाजात घोषणा करीत होते: “राजासनावर बसलेल्या आमच्या परमेश्वरापासून आणि कोकर्यापासून तारणप्राप्ती होत आहे.”
11तेव्हा सर्व देवदूत राजासन व वडीलजन आणि चार सजीव प्राणी यांच्याभोवती उभे होते आणि राजासनासमोर दंडवत घालून उपासना करीत असताना
12ते म्हणाले: “आमेन! आमच्या परमेश्वराला धन्यवाद, गौरव, सुज्ञता, उपकारस्तुती, मान, सामर्थ्य आणि पराक्रम सदासर्वकाळ असो. आमेन!”
13मग या चोवीस वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “हे शुभ्र पोशाख घातलेले कोण आहेत व ते कुठून आले आहेत?”
14मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.” तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत.
15म्हणूनच, “आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर, त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत, ते त्यांच्या सानिध्यात त्यांना आश्रय देतील.
16त्यांना पुन्हा कधी भूक, किंवा तहान लागणार नाही; त्यांना सूर्याचा ताप, किंवा दाहक उष्णता बाधणार नाही.
17कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, ‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्याजवळ नेईल,’ ‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’ ”
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath