ख्रिश्चन धर्म
मागे

प्रकटीकरण 5

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली ग्रंथपटाची गुंडाळी मी पाहिली. ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती.

2एक बलवान देवदूत मोठ्याने घोषणा करीत होता: “हे शिक्के फोडून, या ग्रंथपटाची गुंडाळी उघडावयास पात्र असा कोणी आहे का?”

3पण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली, कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्यात लिहिलेले पाहण्यास समर्थ नव्हता.

4तेव्हा मी फार रडलो. कारण ती गुंडाळी उघडावयास किंवा त्यात पाहावयास योग्य असा कोणीही सापडला नाही.

5पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदाह वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.”

6मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्‍याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठविलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत.

7कोकरा पुढे आला, आणि जे राजासनावर बसले होते, त्यांच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली.

8कोकर्‍याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्‍याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत.

9ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,

10तुम्ही त्या सर्वांना एक राज्य आणि आमच्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी याजक केले आहे; ते पृथ्वीवर राज्य करतील.”

11तेव्हा मी पाहिले हजारो आणि लाखो नव्हे तर अगणित देवदूतांचे गीत ऐकू आले. ते राजासन, सजीव प्राणी व वडीलजनांच्या सभोवती उभे होते.

12ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!”

13मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्‍याला उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो!”

14तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath