स्तोत्रसंहिता 82
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1परमेश्वराने महासभेत आपले स्थान ग्रहण केले आहे; त्यांनी “दैवतांसमोर” आपला न्याय जाहीर केला आहे:
2तुम्ही कुठवर दुष्टांचे समर्थन करणार, अन्यायी लोकांसाठी पक्षपात करत राहणार? सेला
3दुबळे आणि पितृहीनांचे समर्थन करा, गरीब आणि पीडलेल्यांना यथायोग्य न्याय द्या.
4दुर्बल आणि गरजवंत लोकांना वाचवा; दुष्टांच्या तावडीतून त्यांना सोडवा.
5इतर “दैवतां” ना काहीही कळत नाही, काहीही समजत नाही. ते अंधकारात चालतात; पृथ्वीचे सर्व पाये डळमळीत झाले आहेत.
6“मी म्हटले, ‘तुम्ही “दैवते” आहात; तुम्ही सर्वोच्च परमेश्वराचे पुत्र आहात.’
7परंतु तुम्ही मर्त्य मानवांप्रमाणेच मराल; आणि इतर शासकाप्रमाणे तुमचे पतन होईल.”
8हे परमेश्वरा, उठा आणि जगाचा न्याय करा, कारण समस्त राष्ट्र तुमचे वतन आहे.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath