ख्रिश्चन धर्म
मागे

स्तोत्रसंहिता 81

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1परमेश्वर, जे आमचे सामर्थ्य आहेत, त्यांच्यासाठी हर्षाने गा; याकोबाच्या परमेश्वरासाठी जयघोष करा!

2खंजिरीच्या तालावर संगीताचा प्रारंभ करा, वीणा व सतारीवर मधुर स्वर वाजवा.

3नवचंद्राच्या समयी आणि पौर्णिमेच्या सणांच्या दिवशी, आमच्या आनंदोत्सवाच्या वेळी कर्णा वाजवा;

4इस्राएलसाठी हे विधी आहेत, हे याकोबाच्या परमेश्वराचे नियम आहेत.

5जेव्हा परमेश्वराने इजिप्त देशाचा प्रतिकार केला, तेव्हा त्यांनी योसेफाला हे नियम नेमून दिले. मी एक अज्ञात वाणी ऐकली व ती म्हणाली:

6“आता मी त्यांच्या खांद्यावरील भार काढून टाकला आहे; मी त्यांचे हात भार्‍याच्या ओझ्यापासून मुक्त केले आहेत.

7तू संकटाच्या वेळी माझा धावा केलास आणि मी तुला सोडविले; मेघगर्जनेतून मी तुला उत्तर दिले; मरीबाह येथे मी तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहिली. सेला

8माझ्या लोकांनो, माझे ऐका, आणि मी तुम्हाला सावध करेन— हे इस्राएला, तू केवळ माझे ऐकशील तर किती बरे होईल!

9तू कोणत्याही परराष्ट्रीय दैवताची कधीही उपासना करू नकोस; माझ्याशिवाय तू इतर कोणत्याही दैवताला वंदन करू नकोस.

10मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे, ज्याने तुला इजिप्तच्या भूमीतून सोडवून आणले. तू आपले मुख पूर्ण उघड आणि ते मी भरेन.”

11परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही; इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.

12म्हणूनच त्यांच्या मनास येईल तसे हट्टीपणाने मी त्यांना वागू दिले, ते स्वतःची इच्छापूर्ती करत राहिले.

13“परंतु माझ्या लोकांनी केवळ माझे ऐकले असते, जर इस्राएल माझ्या मार्गाने चालले असते तर,

14मी त्याच्या शत्रूंचा किती त्वरेने पाडाव केला असता, आणि त्याच्या विरोधकांवर माझ्या हाताचा प्रहार केला असता!

15जे याहवेहचा तिरस्कार करतात, ते दबकून गेले असते आणि त्यांना मिळालेली शिक्षा सर्वकाळ टिकली असती.

16मग मी तुला उत्तमोत्तम गहू खाऊ घातले असते; तुला डोंगरातील उत्कृष्ट मधाने मी तुला तृप्त केले असते.”

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath