ख्रिश्चन धर्म
मागे

स्तोत्रसंहिता 73

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1निश्चितच परमेश्वर इस्राएलसाठी, जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, त्यांच्यासाठी चांगले आहेत.

2माझ्याविषयी म्हणाल, तर माझे पाय अडखळू लागले होते; माझी पावले घसरण्याच्या बेतास आली होती.

3कारण दुष्टांची समृद्धी पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो होतो.

4होय, आयुष्यभर त्यांचा मार्ग पीडारहित असतो; ते निरोगी आणि सुदृढ असतात.

5इतर मनुष्यांसारखी त्यांच्यावर सहसा संकटे येत नाहीत आणि इतरांप्रमाणे आजाराने पीडलेही जात नाहीत.

6अहंकार त्यांच्या गळ्यातील माळ; हिंसा त्यांची वस्त्रे आहेत.

7त्यांच्या संवेदनशून्य अंतःकरणातून अपराधच निघतात ; त्यांच्या मनातील दुष्ट कल्पनांना मर्यादा नाही.

8ते उपहास करतात आणि वाईट गोष्टी बोलतात; गर्विष्ठपणामुळे ते दडपशाहीची धमकी देतात.

9ते प्रत्यक्ष स्वर्गावर दावा करतात आणि त्यांची जीभ पृथ्वीवर फुशारक्या मारीत फिरते.

10म्हणून त्यांचे लोक त्यांच्याकडे वळतात, आणि ते विपुल प्रमाणात पाणी पितात.

11ते असेही म्हणतात, “परमेश्वराला कसे समजणार? परात्पर परमेश्वराला सर्व गोष्टीचे ज्ञान आहे काय?”

12असे असतात दुष्ट लोक—नेहमी निश्चिंत; आणि त्यांची संपत्ती वाढतच जाते.

13माझे हृदय शुद्ध ठेऊन मला काय लाभ झाला आणि मी माझे हात व्यर्थच निर्दोष ठेवले.

14दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे.

15जर हे उद्गार माझ्या मुखातून बाहेर पडले असते, तर मी तुमच्या प्रजेचा विश्वासघात करणारा ठरलो असतो.

16ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले.

17मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले.

18निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे; तुम्ही त्यांना सर्वनाशाकडे खाली लोटून द्याल.

19क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.

20जसे जागे होणाऱ्या मनुष्याला स्वप्न पडते; त्याचप्रमाणे हे प्रभू, तुम्ही जागे व्हाल तेव्हा त्यांचे दुस्वप्न तुच्छ जाणाल.

21जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता,

22त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो!

23तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा उजवा हात धरलेला आहे.

24तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल.

25स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे? पृथ्वीवर तुमच्याएवढे प्रिय मला दुसरे कोणीही नाही.

26माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत.

27जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; तुमच्याशी विश्वासघात करणार्‍यांना तुम्ही नष्ट करता.

28परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे. मी याहवेह माझे प्रभू यांना आश्रयस्थान केले आहे. जेणेकरून मी तुमच्या सर्व महान कृत्यांची घोषणा करेन.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath