ख्रिश्चन धर्म
मागे

स्तोत्रसंहिता 64

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1हे परमेश्वरा, माझे गार्‍हाणे ऐका; शत्रूंच्या भयापासून माझ्या जिवास सुरक्षित ठेवा.

2दुष्टांच्या षडयंत्रापासून आणि गुन्हेगार टोळक्यांच्या कारस्थानापासून मला लपवा.

3तलवारीप्रमाणे ते आपल्या जिभांना धारदार करतात आणि बाणांप्रमाणे तीक्ष्ण असलेल्या कटुशब्दांनी लक्ष्य करतात.

4दबा धरून ते निरपराध्यांवर बाण सोडतात; ते निर्भयपणे अकस्मात त्यांच्यावर मारा करतात;

5दुष्कृत्य करण्यास ते एकमेकांना प्रोत्साहन देतात; सापळे आखण्यासाठी ते गुप्तपणे एकत्र जमतात; ते म्हणतात, “ते कोण पाहणार?”

6ते कुटिल योजना बनवून म्हणतात, “आता आम्ही उत्तम योजना तयार केली आहे!” मानवी अंतःकरण आणि हृदय समजणे कठीण आहे.

7परंतु स्वतः परमेश्वरच त्यांचा बाण मारतील; अचानक ते घायाळ होतील.

8परमेश्वर त्यांची जीभ त्यांच्याच विरुद्ध करतील आणि त्यांचा नाश करतील. जे सर्व त्यांना पाहतील, ते उपहासाने आपले डोके हालवतील.

9मग सर्व मानव घाबरतील; ते परमेश्वराच्या कृत्यांची थोरवी गातील; आणि त्यांनी केलेल्या चमत्काराविषयी मनन करतील.

10पण नीतिमान लोक याहवेहमध्ये आनंद करतील व त्यांचा आश्रय घेतील, सरळ हृदयाचे त्यांचे स्तवन करतील!

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath