स्तोत्रसंहिता 60
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!
2तुम्ही भूमी कंपित केली आहे आणि तुम्ही तिला दुभंगले आहे; आता तुम्हीच तिला नीटनेटके करा, कारण ती सर्वस्वी हादरली आहे.
3तुम्ही आमच्याबाबत अतिशय कठोर झाले आहात; तुम्ही आम्हाला झोकांड्या खावयास द्राक्षारस दिला आहे.
4परंतु तुम्ही आपल्या भय बाळगणार्यांकरिता एक झेंडा उंचाविला आहे की तो आमच्या शत्रुंविरुद्ध प्रदर्शित करू. सेला
5आम्हाला वाचवा आणि तुमच्या उजव्या हाताने मदत करा म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर प्रीती करता त्यांचे तारण होईल.
6परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.
7गिलआद माझा आहे. मनश्शेह माझा आहे. एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे. यहूदाह माझा राजदंड आहे.
8मोआब माझे हात धुण्याचे गंगाळ आहे, आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन; पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”
9मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?
10परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना, आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?
11शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा, कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.
12परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath