स्तोत्रसंहिता 57
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1माझ्या परमेश्वरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. कारण मी तुमचा आश्रय घेतला आहे; संकटे जाईपर्यंत मी तुमच्या पंखांच्या छायेखाली आश्रय घेईन.
2जे मला निर्दोष ठरवितात, त्या सर्वोच्च परमेश्वराचा मी धावा करेन.
3ते स्वर्गातून साहाय्य पाठवून माझे तारण करतील; जे माझा पाठलाग करतात त्यांचा ते तिरस्कार करतात; सेला परमेश्वर त्यांची प्रीती आणि विश्वासूपणा पाठवून देतील.
4सिंहांनी मला घेरले आहे; ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवार आहे अशा हिंसक स्वभावाच्या मनुष्यांमध्ये मी पडलो आहे.
5हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.
6माझ्या पावलांसाठी त्यांनी सापळा लावला आहे— संकटात मी वाकून गेलो होतो. माझ्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी खड्डा खणला होता— परंतु ते स्वतःच त्यात पडले आहेत. सेला
7हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.
8हे माझ्या जिवा, जागृत हो! अगे सारंगी, आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.
9हे प्रभू, मी प्रत्येक राष्ट्रात तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.
10कारण तुमचे वात्सल्य महान असून ते गगनमंडळाला भिडले आहे; तुमचे विश्वासूपण आकाशाला जाऊन पोहोचते.
11हे परमेश्वरा, तुम्ही गगनमंडळाहून उदात्त केले जावोत; तुमचे गौरव सर्व पृथ्वी व्यापून टाको.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath