स्तोत्रसंहिता 54
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1परमेश्वरा, तुम्ही आपल्या नावाने माझे तारण करा; आपल्या सामर्थ्याने मला निर्दोष जाहीर करा.
2परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐका. माझ्या मुखातील शब्दांकडे कान द्या.
3कारण परकी माणसे माझ्याविरुद्ध उठली आहेत; परमेश्वराचा आदर न करणारे निर्दयी लोक— माझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेला
4परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत; परमेश्वरच आहेत, जे मला मदत करतात.
5माझ्या शत्रूंच्या दुष्ट कृत्त्यांचा मोबदला त्यांना मिळो; परमेश्वरा, तुम्ही आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश करा.
6मी स्वेच्छेने माझे यज्ञ तुम्हाला अर्पण करणार; याहवेह, तुमच्या नावाची महिमा मी गाईन, कारण तुमचे नाव उत्तम आहे.
7तुम्ही मला माझ्या सर्व संकटातून सोडविले आहे, आणि माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पहिला आहे.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath