स्तोत्रसंहिता 48
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.
2त्यांचे शिखर मनोहर आहेत, ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे, सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन पर्वतासारखेच उंच आहे, जे राजाधिराजाची नगरी आहे.
3परमेश्वराने स्वतःला तिच्या राजमहालांमध्ये उंच आश्रयदुर्ग असे तिला प्रकट केले आहे.
4ज्यावेळी राजांनी आपली सैन्ये एकवटली, ज्यावेळी ते एकत्र होऊन आगेकूच करीत आले.
5त्यांनी हिला पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले; भयभीत होऊन त्यांनी पळ काढला.
6त्या ठिकाणी त्यांना कापरे भरले; स्त्रीला होणार्या प्रसूतीच्या वेदनांसारख्या वेदना त्यांना होऊ लागल्या.
7पूर्वेकडील वार्याने तार्शीशच्या गलबतांच्या नष्ट व्हाव्यात, त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा नाश केला.
8आम्ही जे ऐकले होते, आणि आम्ही जे प्रत्यक्ष पहिले आहे सर्वशक्तिमान याहवेहच्या नगरात, आमच्या परमेश्वराच्या नगरात: परमेश्वर सर्वकाळासाठी तिला स्थिर करतील. सेला
9परमेश्वरा, तुमच्या मंदिरात, आम्ही तुमच्या प्रेमदयेचे चिंतन करतो.
10हे परमेश्वरा, तुमच्या नावाप्रमाणे, तुमची स्तुती देखील पृथ्वीवर सर्वत्र पसरली आहे. तुमचा उजवा हात नीतिमत्तेने परिपूर्ण आहे.
11तुमच्या न्यायकृत्यांमुळे सीयोन पर्वत आनंद करो; यहूदाहची नगरे हर्ष करोत.
12सीयोनेभोवती फिरा, तिची फेरी मारा, तिचे बुरूज मोजा.
13तिची तटबंदी पाहा आणि तिच्यातील राजवाडे न्याहाळून पाहा, म्हणजे तुम्हाला तिचे वर्णन करून तुमच्या पुढील पिढीला सांगता येईल.
14कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत; ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath