स्तोत्रसंहिता 32
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे.
2धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही.
3मी गप्प राहिलो, तेव्हा संपूर्ण दिवस माझी हाडे माझ्या कण्हण्यामुळे जर्जर झाली.
4रात्रंदिवस तुमचा हात माझ्यावर भारी होता; उष्मकालच्या उष्णतेप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली होती. सेला
5नंतर मी माझी सर्व पातके तुमच्याजवळ कबूल केली आणि माझे अपराध लपविले नाही. मी स्वतःशी म्हणालो, “मी याहवेहजवळ माझी पातके कबूल करेन.” तेव्हा तुम्ही माझ्या पातकांच्या दोषाची क्षमा केली. सेला
6यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याने तुम्हाला पावण्याची संधी आहे तोपर्यंत तुमची प्रार्थना करावी; संकटे जलाच्या महापूरासारखी आली तरी त्यांना त्याचा स्पर्श होणार नाही.
7माझे आश्रयस्थान तुम्ही आहात; संकटात तुम्हीच माझे रक्षण करणार आणि मुक्ततेच्या गीतांनी तुम्ही मला वेढणार. सेलाह
8याहवेह म्हणतात, जो मार्ग तू अनुसरावा त्याचे मी तुला मार्गदर्शन व शिक्षण देईन; माझी प्रेमळ नजर तुजवर ठेऊन मी तुला बोध करेन.
9तुमची मनोवृत्ती घोड्यासारखी किंवा खेचरासारखी नसावी, ज्यांना काही समज नसते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी अंकुश आणि लगाम लागतो, अन्यथा ते आपल्याजवळ येणार नाहीत.
10दुर्जनांवर अनेक दुःखे येतात. परंतु जे याहवेहवर विश्वास ठेवतात, त्यांच्याभोवती त्यांच्या अक्षयप्रीतीचे वेष्टण असते.
11नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद आणि हर्ष करा; तुम्ही जे सरळ मनाचे आहात, ते आनंदाने आरोळ्या मारा.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath