स्तोत्रसंहिता 2
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?
2याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,
3“चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”
4स्वर्गातील सिंहासनावर जे विराजमान आहेत ते हसतात; प्रभू त्यांचा उपहास करतात.
5ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात,
6“सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.”
7मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन: ते मला असे म्हणतात, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.
8माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल.
9तुम्ही त्यांना लोखंडी राजदंडाने मोडून टाकणार, तुम्ही मातीच्या पात्रांप्रमाणे त्यांचा चुराडा कराल.”
10म्हणून अहो राजांनो, शहाणे व्हा; पृथ्वीवरील शासक सावध व्हा.
11भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा.
12त्यांच्या पुत्राचे चुंबन घ्या, नाहीतर ते रागावतील, आणि तुमचे मार्ग तुम्हाला नाशाकडे घेऊन जातील, कारण एका क्षणात त्यांचा क्रोधाग्नी पेटेल. धन्य आहेत ते सर्वजण जे त्यांना शरण जातात.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath