ख्रिश्चन धर्म
मागे

स्तोत्रसंहिता 129

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1“माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,” इस्राएल म्हणो;

2“माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही.

3शेतकर्‍याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली.

4परंतु याहवेह न्यायी आहेत; त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.”

5सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत.

6घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत, जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते;

7कापणार्‍यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्‍यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.

8येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत, “याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत; आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.”

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath