ख्रिश्चन धर्म
मागे

स्तोत्रसंहिता 126

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले , तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.

2आमचे मुख हास्याने भरले होते आणि किती हर्षगीते आम्ही गाईली! तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली: “पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”

3याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत, आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.

4हे याहवेह, नेगेव नदीसारखी, आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या .

5जे अश्रूंनी पेरणी करतात, ते आनंदाने कापणी करतील.

6जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath