स्तोत्रसंहिता 118
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
2इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
3अहरोनाच्या वंशजांनी म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
4याहवेहचे भय धरणारे म्हणोत, “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”
5संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले.
6याहवेह माझ्यासोबत आहेत, मला कशाचेही भय वाटणार नाही; नश्वर मानव मला काय करणार?
7याहवेह माझ्यासोबत आहेत; ते माझे सहायक आहेत. मी माझ्या शत्रूकडे विजयान्वित दृष्टीने बघेन.
8नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
9अधिपतींवर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.
10सर्व राष्ट्रांनी मला वेढा घातला, परंतु याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला.
11त्यांनी सर्व बाजूने मला वेढा घातला, परंतु याहवेहच्या नावाने मी त्यांचा नायनाट केला.
12मधमाश्यांप्रमाणे ते माझ्याभोवती घोंगावत होते, पण जळत्या काटेरी झुडूपांसारखे ते लगेच जळून खाक झाले; याहवेहच्या नावाने मी त्यांचा नाश केला.
13त्यांनी मला असे ढकलले की मी मागे पडलो असतो, परंतु याहवेहने मला साहाय्य केले.
14याहवेह माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; तेच माझे तारण झाले आहेत.
15नीतिमान लोकांच्या घरातून आनंदाच्या व विजयाच्या गीतांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत: “याहवेहच्या उजव्या भुजाने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!
16याहवेहचा उजवा हात उंचावलेला आहे; याहवेहच्या उजव्या भुजेने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!”
17मी मरणार नाही तर जगेन, आणि याहवेहची कृत्ये विदित करेन.
18याहवेहने मला कठोर शिक्षा केली, परंतु त्यांनी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.
19माझ्यासाठी नीतिमत्वाची दारे उघडू द्या; मी आत प्रवेश करून याहवेहचे उपकारस्मरण करेन.
20याहवेहची दारे हीच आहेत; याच दारातून नीतिमान प्रवेश करतात.
21मी तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले; तुम्ही माझे तारण झाला आहात.
22जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच आता कोनशिला झाला आहे;
23ही याहवेहची करणी आहे, आणि आमच्या दृष्टीने ती अद्भुत आहे.
24याहवेहने आज हे केले आहे; आजच आपण आनंद व उल्लास करू.
25याहवेह, आमचे तारण करा! याहवेह, आम्हाला यशस्वी करा!
26याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो. आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.
27याहवेहच परमेश्वर आहेत; त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे. डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी मिरवणुकीत सामील व्हा.
28तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन; तुम्हीच माझे परमेश्वर आहात, मी तुमचे स्तुतिगान करेन.
29याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath