ख्रिश्चन धर्म
मागे

स्तोत्रसंहिता 101

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1हे याहवेह, तुमची प्रीती आणि न्याय याविषयी मी गीत गाईन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.

2सुज्ञपणाने जीवन जगणे हे माझे लक्ष्य आहे— तुम्ही माझ्याकडे कधी येणार? माझ्या घरातील माझा व्यवहार मी निष्कलंक तर्‍हेने करेन.

3मी कुठल्याच अनुचित वस्तूकडे नजर टाकणार नाही. मला विश्वासहीन लोकांच्या व्यवहारांचा तिरस्कार आहे. त्यांच्यापासून मी अलिप्त राहीन.

4कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील; अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही.

5आपल्या शेजार्‍यांची गुप्तपणे निंदानालस्ती करणार्‍यास, मी नष्ट करेन; दुसर्‍यांकडे तुच्छतेने पाहणार्‍याचा व अहंकारी हृदयाच्या मनुष्याचा सहवास मला असह्य वाटेल.

6देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन, जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील; ज्यांचे आचरण दोषरहित असेल, असेच लोक माझी सेवा करतील.

7परंतु जे इतरांची फसवणूक करतात, अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही, आणि जे असत्य बोलतात, ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.

8दररोज सकाळी मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन; याहवेह देवाच्या या नगरीतील प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath