ख्रिश्चन धर्म
मागे

नीतिसूत्रे 2

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील,

2सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील, तुझे मन समंजसपणाकडे लावशील—

3मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,

4आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील,

5तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.

6कारण याहवेह सुज्ञान देतात; त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.

7नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत.

8कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात.

9तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर, आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल.

10सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,

11तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल.

12सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.

13ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत,

14ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात,

15ज्यांचे मार्ग विकृत आहेत आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत!

16सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून,

17जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.

18निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.

19तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.

20यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील, आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील.

21कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;

22परंतु दुष्ट लोकांचा देशातून समूळ नायनाट होईल आणि तेथील अविश्वासू लोकांचे उच्चाटन केले जाईल.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath