ख्रिश्चन धर्म
मागे

नीतिसूत्रे 22

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.

2श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे.

3सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.

4याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.

5दुष्टाच्या मार्गात काटे व पाश असतात; परंतु जे त्यांच्या जिवास जपतात, ते अशा मार्गांपासून दूर राहतात.

6लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.

7जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो.

8जो कोणी अन्यायाची पेरणी करतो, तो अरिष्टांची कापणी करेल, आणि त्यांनी रागाने उगारलेली काठी तुटून जाईल.

9उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात.

10टवाळखोराला हाकलून द्या, कलह आपोआप संपेल; भांडण आणि अपमान देखील बंद होतील.

11जो शुद्ध हृदयावर प्रेम करतो आणि कृपायुक्त भाषण करतो तो राजाचा मित्र होईल.

12याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात, परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात.

13आळशी म्हणतो, “बाहेर सिंह आहे! तो मला भर चौकात ठार करेल!”

14वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात.

15बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते, परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल.

16श्रीमंत होण्यासाठी जो गरिबांवर जुलूम करतो तो आणि जो श्रीमंतांना बक्षिसे देतो—दोघेही दरिद्री होतील.

17लक्ष दे आणि सुज्ञानाचा बोलण्याकडे तुझे कान वळव; मी जे शिक्षण देतो त्याचे तुझ्या हृदयापासून पालन कर,

18जेव्हा तू ते आपल्या हृदयात ठेवशील आणि ते सर्व तुला मुखाग्र असतील तर तुला आनंद मिळेल.

19म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील, मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा.

20सल्लामसलत आणि ज्ञान याविषयी मी तीस वचने तुमच्यासाठी लिहिली नव्हती काय?

21प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील?

22गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका,

23कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील.

24तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका,

25नाहीतर तुम्ही त्यांचाच कित्ता गिरवाल, आणि तुम्ही स्वतःच आपला जीव पाशात घालाल.

26वचन देऊन हात मिळवणी करणार्‍यासारखे तुम्ही होऊ नका किंवा कर्जाचे जामीन होऊ नका;

27जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.

28ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका.

29आपल्या कामात निपुण असणारी माणसे तू पाहिली आहे का? ते खालच्या श्रेणीच्या अधिकार्‍यांसमोर नाही तर राजांसमोर सेवा करतील.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath