ख्रिश्चन धर्म
मागे

गणना 7

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1जेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.

2मग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली.

3त्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्‍यामागे एक बैल आणि दोन पुढार्‍यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.

4याहवेहने मोशेला म्हटले,

5“तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.”

6तेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.

7गेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले.

8आणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.

9कोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते.

10जेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्‍यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.

11कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्‍याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”

12पहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.

13त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

14दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.

15होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षांचा कोकरा;

16पापार्पणासाठी एक बोकड;

17आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. ही अम्मीनादाबाचा पुत्र नहशोनाची अर्पणे होती.

18दुसर्‍या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली.

19त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

20दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

21होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

22पापार्पणासाठी एक बोकड;

23आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. सूवाराचा पुत्र नथानेलाचे हे अर्पण होते.

24तिसर्‍या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख, हेलोनाचा पुत्र एलियाबाने आपले अर्पणे आणले.

25त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे. ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

26दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

27होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

28पापार्पणासाठी एक बोकड;

29आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. हेलोनचा पुत्र एलियाबाचे हे अर्पण होते.

30चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले.

31त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

32दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

33होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

34पापार्पणासाठी एक बोकड;

35आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. शेदेऊरचा पुत्र एलीसूराचे हे अर्पण होते.

36पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले.

37त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

38दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

39होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

40पापार्पणासाठी एक बोकड;

41आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाचे हे अर्पण होते.

42सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले.

43त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

44दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

45होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

46पापार्पणासाठी एक बोकड;

47आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. देउएलाचा पुत्र एलीआसाफाचे हे अर्पण होते.

48सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाने आपले अर्पण आणले.

49त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

50दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

51होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

52पापार्पणासाठी एक बोकड;

53आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाचे हे अर्पण होते.

54आठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले.

55त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

56दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

57होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

58पापार्पणासाठी एक बोकड;

59आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची नर पाच कोकरे. पदहसूरचा पुत्र गमलीएलचे हे अर्पण होते.

60नवव्या दिवशी बिन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा पुत्र अबीदान याने आपले अर्पण आणले.

61त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

62दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

63होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

64पापार्पणासाठी एक बोकड;

65आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. गिदोनीचा पुत्र अबीदानाचे हे अर्पण होते.

66दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर याने आपले अर्पण आणले.

67त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

68दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

69होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

70पापार्पणासाठी एक बोकड;

71आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजराचे हे अर्पण होते.

72अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख ओक्रानाचा पुत्र पगीयेल याने आपले अर्पण आणले.

73त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

74दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

75होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

76पापार्पणासाठी एक बोकड;

77आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. ओक्रानाचा पुत्र पगीयेलाचे हे अर्पण होते.

78बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा पुत्र अहीराने आपले अर्पण आणले.

79त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

80दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

81होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

82पापार्पणासाठी एक बोकड;

83आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. एनानाचा पुत्र अहीराचे हे अर्पण होते.

84जेव्हा वेदीचा अभिषेक झाला तेव्हा इस्राएलच्या पुढार्‍यांकडून तिच्या समर्पणाची अर्पणे ही होती: बारा चांदीची ताटे, बारा शिंपडण्याचे भांडे आणि बारा सोन्याची पात्रे होती.

85चांदीचे प्रत्येक ताट एकशे तीस शेकेल वजनाचे होते आणि शिंपडण्याचे प्रत्येक भांडे सत्तर शेकेल वजनाचे होते. ते सर्व मिळून, चांदीची भांडी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती.

86धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे, प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती. पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ते सोन्याचे पात्र एकशेवीस शेकेल वजनाचे होते.

87होमार्पण व त्याबरोबर अन्नार्पणासाठी एकूण बारा तरुण बैल, बारा गोर्‍हे, एक वर्षाची बारा नरकोकरे होती. बारा बोकडे पापार्पणांसाठी वापरण्यात आली.

88शांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्‍हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती. वेदीच्या अभिषेकानंतर तिच्या समर्पणाकरिता ही अर्पणे होती.

89जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath