ख्रिश्चन धर्म
मागे

गणना 1

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:

2“संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.

3तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी.

4प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.

5“तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;

6शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;

7यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;

8इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल;

9जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;

10योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;

11बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;

12दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;

13आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;

14गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;

15नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”

16हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.

17मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले,

18आणि दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली.

19याहवेहने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणेच सीनायच्या रानात त्याने त्यांची गणती केली:

20इस्राएलचा पहिला पुत्र रऊबेनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे, सैन्यात सेवा करण्यास सक्षम असणाऱ्या सर्व पुरुषांची नावे, त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

21रऊबेनाच्या गोत्रांची संख्या 46,500 होती.

22शिमओनाच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष व जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंबानुसार नोंदण्यात आली.

23शिमओनाच्या गोत्रांची संख्या 59,300 होती.

24गादच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

25गाद गोत्रांची संख्या 45,650 होती.

26यहूदाहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

27यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.

28इस्साखारच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

29इस्साखार गोत्रांची संख्या 54,400.

30जबुलूनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

31जबुलून गोत्रांची संख्या 57,400.

32योसेफाच्या पुत्रांमधून: एफ्राईमच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

33एफ्राईमच्या गोत्रांची संख्या 40,500.

34मनश्शेहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

35मनश्शेहच्या गोत्रांची संख्या 32,200 होती.

36बिन्यामीनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

37बिन्यामीन गोत्रांची संख्या 35,400 होती.

38दानच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

39दान गोत्रांची संख्या 62,700 होती.

40आशेरच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

41आशेर गोत्रांची संख्या 41,500 होती.

42नफतालीच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

43नफताली गोत्रांची संख्या 53,400 होती.

44मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्‍यांनी मोजलेले पुरुष ते हेच.

45सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली.

46एकूण संख्या 6,03,550 होती.

47परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.

48याहवेहने मोशेला सांगितले होते:

49“लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये.

50परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.

51ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे.

52इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे.

53परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”

54याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath