इय्योब 9
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1मग इय्योबाने उत्तर दिले,
2“खरोखर, हे सत्य आहे हे मी जाणतो. परंतु सामान्य मनुष्य परमेश्वरासमोर आपली निर्दोषता कशी सिद्ध करेल?
3त्याने जरी परमेश्वराशी वाद करण्याचे ठरविले, तरी हजारातून एकाचेही उत्तर त्याला देता येणार नाही.
4त्यांचे ज्ञान अगाध व त्यांचे सामर्थ्य विशाल आहे. त्यांच्याशी विरोध करून कोण टिकला आहे?
5ते पर्वतांना त्यांना नकळत त्यांच्या ठिकाणातून हलवितात, आणि आपल्या रागात त्यांना उलथून टाकतात.
6ते पृथ्वीला तिच्या जागेवरून हालवितात, आणि तिचे स्तंभ डळमळीत करतात.
7ते सूर्याशी बोलतात आणि तो प्रकाशित होत नाही; ते तार्यांचा प्रकाश मुद्रित करतात.
8तेच एकटे आकाश ताणून पसरवितात आणि समुद्राच्या लाटांवरून चालतात.
9सप्तर्षी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे यांचा तेच उत्पन्नकर्ता आहेत.
10आकलन करू शकत नाही अशी अद्भुत कृत्ये; आणि मोजता येत नाहीत असे चमत्कार ते करतात.
11ते माझ्या जवळून जातात; पण मी त्यांना पाहू शकत नाही; ते निघून जातात तरी मला आकलन होत नाही.
12जर त्यांनी हिसकावून घेतले तरी त्यांना कोण थांबवेल? ‘तुम्ही काय करता,’ असे त्यांना कोण विचारणार?
13परमेश्वर आपला क्रोध आवरत नाहीत; राहाबाच्या सैन्याची टोळी सुद्धा त्यांच्यापुढे गुडघे टेकते.
14“तर मी त्यांच्याशी कसा वाद घालणार? त्यांच्याशी वाद घालण्यास शब्द मी कसे शोधू?
15मी जरी निर्दोष असलो, तरी मी त्यांना उत्तर देणार नाही; मी केवळ माझ्या न्यायाधीशाजवळ दयेची भीक मागेन.
16मी धावा केला असता तर त्यांनी प्रतिसाद दिला असता; तरी ते माझे ऐकतीलच अशी मला खात्री नाही.
17वादळाने ते मला चेंगरून टाकतात आणि विनाकारण माझ्या जखमा वाढवतात.
18ते मला श्वास घेऊ देत नाहीत, परंतु मला क्लेशांनी त्रस्त करतात.
19जर बळाविषयी म्हटले तर, तेच बलवान आहेत! आणि जरी न्यायासंदर्भात म्हटले तर त्यांना कोण आव्हान देईल?
20मी जरी निर्दोष असलो, तरी माझे मुख माझा निषेध करेल; मी दोषरहित असतो, तरी माझे मुख मलाच दोषी ठरवेल.
21“मी जरी निर्दोष असलो, मला स्वतःबद्दल चिंता नाही; मी स्वतः माझे जीवन तुच्छ मानतो.
22हे सर्व समानच आहे म्हणून मी म्हणतो, ‘निर्दोषी आणि दोषी या दोघांचाही ते नाश करतात.’
23जेव्हा एखादी पीडा अचानक मरण आणते, निरपराध्यांच्या निराशेचा ते उपहास करतात.
24जेव्हा पृथ्वी दुष्टाच्या हाती जाते, ते न्यायाधीशांचे डोळे झाकतात. जर ते नाहीत, तर मग कोण?
25“माझे दिवस एखाद्या धावपट्टू पेक्षाही वेगवान आहेत; आनंदाची झलक नसतानाच ते उडून जातात.
26ते लव्हाळ्याच्या वेगवान तारवांसारखे, भक्ष्यावर झडप घालणार्या गरुडासारखे निघून जात आहेत.
27मी जर म्हणालो की, ‘मी माझे गार्हाणे विसरेन, माझे भाव बदलून उल्हास करेन,’
28तरी माझ्यावर आणखी मोठी दुःखे येतील; कारण हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की तुम्ही मला निर्दोष ठरविणार नाही.
29मी आधी दोषी ठरविला गेलो आहे, तर मग मी व्यर्थ प्रयत्न का करावे?
30जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले,
31तरी देखील तुम्ही मला चिखलाच्या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.
32“कारण ते माझ्यासारखे मानव नाहीत की मी त्यांना उत्तर द्यावे, किंवा न्यायालयात आम्ही समोरासमोर येऊन वाद घालू.
33परंतु आमच्यामध्ये जर कोणी मध्यस्थी करणारा असता, कोणी आम्हाला एकत्र आणणारा असता,
34कोणीतरी परमेश्वराचा दंड माझ्यावरून काढावा, म्हणजे त्यांचा धाक मला अजून भयभीत करणार नाही.
35मग मी त्यांच्याशी निर्भयपणे बोलेन, पण या घटकेला, मी ते करू शकत नाही.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath