इय्योब 38
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1मग याहवेह वादळातून इय्योबाशी बोलले, ते म्हणाले:
2“हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?
3पुरुषाप्रमाणे आपली कंबर कसून घे; मी तुला प्रश्न विचारेन, आणि तू मला उत्तर देशील.
4“मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? तुला समजत असेल तर सांग.
5तिचे आकारमान कोणी आखले? खचित तुला ठाऊक असणार! तिच्यावर मापनसूत्र कोणी ताणले?
6तिचे पाये कशावर रोवले आहे, किंवा तिची कोनशिला कोणी बसवली—
7जेव्हा प्रभात तार्यांनी एकत्र गाणी गाईली आणि सर्व देवदूतांनी हर्षनाद केला तेव्हा तू कुठे होता?
8“सागर जसा गर्भातून उफाळून समोर आला तेव्हा त्याला दारांच्या मागे कोणी अडविले,
9जेव्हा मी ढगांसाठी वस्त्र बनविली आणि त्यांना दाट अंधकारात लपेटले,
10जेव्हा त्याच्या मर्यादा मी निश्चित केल्या आणि त्यांची दारे आणि गजे त्यांच्या ठिकाणी लावून दिली,
11जेव्हा मी म्हणालो, ‘तुम्ही येथवरच यावे आणि यापलीकडे नाही; तुझ्या उन्मत्त लाटा येथेच थांबतील’?
12“तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का, किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे,
13यासाठी की ते पृथ्वीच्या टोकांना पकडतील आणि दुष्टांना त्यातून झटकून टाकतील?
14जशी शिक्क्याच्या खाली ओली माती, तशी पृथ्वी आकार घेते; आणि वस्त्रासारखी त्याची मुद्रा उठून दिसते.
15दुष्टांपासून त्यांचा प्रकाश मागे रोखला जातो, आणि त्यांचा उगारलेला हात मोडला जातो.
16“समुद्राच्या उगम स्थानांपर्यंत तू कधी प्रवास केला काय किंवा त्याच्या खोल गर्तेमध्ये कधी चालत गेलास काय?
17मृत्यूची द्वारे तुला दाखविली गेली आहेत काय? अति खोल अंधकाराचे दरवाजे तू पाहिलेस काय?
18पृथ्वीचा विस्तार केवढा आहे याचे आकलन तुला झाले आहे का, हे सर्व जर तू जाणतोस तर मला सांग.
19“प्रकाशाच्या निवासस्थानाकडे नेणारी वाट कोणती आहे? आणि अंधार कुठे वस्ती करतो?
20त्यांच्या ठिकाणांपर्यंत त्यांना तू घेऊन जाशील काय? त्यांच्या घराच्या वाटा तुला माहीत आहेत काय?
21तुला हे नक्कीच माहीत असणार, कारण तेव्हा तर तू जन्मला होता! तू तर पुष्कळ वर्षे जगला आहेस!
22“हिमाच्या कोठारांमध्ये तू प्रवेश केलास काय किंवा गारांची भांडारे तू पाहिलीस काय?
23जी मी संकट काळासाठी, लढाई आणि युद्धाच्या दिवसांसाठी राखून ठेवतो?
24आकाशात चमकणारी वीज कुठून पांगवली जाते, किंवा जिथून पूर्वेचा वारा पृथ्वीवर विखुरला जातो, त्याचा मार्ग कुठे आहे?
25मुसळधार पावसासाठी प्रवाह, आणि वादळी पावसाची वाट कोण खणतात,
26म्हणजे ज्या भूमीवर कोणीही लोक राहत नाहीत, निर्जन वाळवंटामध्ये पाणी पुरवठा करू शकेल,
27यासाठी की ते ओसाड उजाड भूमीला तृप्त करेल व तिथे गवत उगवू शकेल?
28पावसाला पिता आहे का? दहिवराच्या थेंबांचा पिता कोण आहे?
29बर्फ कोणाच्या उदरातून येते? आकाशातील गारठ्याला कोण जन्म देते
30जेव्हा पाणी दगडासारखे घट्ट होते, जेव्हा खोल सागराचा पृष्ठभाग गोठून जातो?
31“कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय?
32तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय?
33स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय?
34“ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय पुराच्या पाण्याने स्वतःला झाकता येईल काय?
35आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय? ‘आम्ही इथे आहोत’ असे निवेदन ते तुला देतात काय?
36पाणपक्ष्याला ज्ञान कोण देते, किंवा कोंबड्याला समज कोणी दिला?
37मेघांची गणना करण्याचे बुद्धिसामर्थ्य कोणाजवळ आहे? जेव्हा माती कडक होते, आणि जमिनीची ढेकळे एकत्र चिकटतात? तेव्हा आकाशातील बुधले कोणाला ओतता येतील?
39“सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? तरुण सिंहांची भूक तू शमवतोस का?
40ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात किंवा दाट झाडीमध्ये वाट बघत असतात?
41कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात?
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath