ख्रिश्चन धर्म
मागे

इय्योब 25

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले:

2“प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे; तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.

3त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय? आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही?

4मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय?

5जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत,

6मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath