यशायाह 4
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1त्या दिवसात सात स्त्रिया एका पुरुषास धरून असे म्हणतील “आम्ही स्वतःचे अन्न मिळवू आणि स्वतःचे वस्त्र मिळवू; आम्हाला केवळ तुझे नाव चालवू दे, आणि आमची अप्रतिष्ठा घालवून दे!”
2त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल.
3सीयोनात उरलेले लोक जे यरुशलेममध्येच राहिले, त्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते पवित्र म्हणविले जातील.
4प्रभू परमेश्वर सीयोनच्या स्त्रियांची घाण धुवून टाकतील; ते न्यायाच्या आत्म्याने आणि अग्नीच्या आत्म्याने यरुशलेममधील रक्ताचे डाग स्वच्छ करतील.
5त्यानंतर याहवेह संपूर्ण सीयोन पर्वतावर आणि तिथे जमलेल्या सर्वांवर दिवसा धुराचा ढग आणि रात्रीच्या वेळेस प्रखर अग्नी प्रज्वलित करतील; या सर्व गोष्टींवर गौरवाचे एक छत असेल.
6दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath