ख्रिश्चन धर्म
मागे

उत्पत्ती 36

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1एसाव म्हणजे एदोम याची वंशावळ ही:

2एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह

3आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ.

4एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला.

5एसावापासून ओहोलीबामाहला यऊश, यालाम व कोरह या नावांचे पुत्र झाले. एसावाला हे सर्व पुत्र कनान देशात झाले.

6मग एसाव आपल्या स्त्रिया, मुलेबाळे, आपल्या घरची सर्व नोकरमंडळी, आपली गुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळविलेली धनसंपत्ती घेऊन याकोबापासून दूर निघून तिथे वस्ती करून राहिला.

7कारण त्या दोघांकडे इतकी अधिक धनसंपत्ती होती की त्यांच्या गुरांना पुरतील इतकी कुरणे तिथे नव्हती.

8म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली.

9सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी.

10एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल.

11एलीफाजचे पुत्र: तेमान, ओमर, सेपो, गाताम व केनाज होते.

12एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.

13रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.

14एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले.

15एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,

16कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.

17एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.

18एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून: यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले.

19हे एसावाचे (अर्थात् एदोमाचे) पुत्र, जे त्यांच्या कुळाचे पुढारी होते.

20एदोम देशातील रहिवासी, सेईर होरी याच्या पुत्रांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह,

21दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले.

22लोटानाचे पुत्र: होरी व होमाम . तिम्ना लोटानाची बहीण होती.

23शोबालाचे पुत्र: अलवान, मानहथ, एबाल, शेफो व ओनाम.

24सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)

25अनाहचा पुत्र: दिशोन असून त्याची कन्या ओहोलीबामाह ही होती.

26दिशोनाचे पुत्र: हेमदान, एश्बान, इथरान व करान.

27एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व आकान.

28दिशोनाचे पुत्र: ऊस व अरान.

29होरी लोकांमधून प्रमुख झालेल्यांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अना,

30दिशोन, एसर व दीशान. ते सेईर देशातील होरींचे प्रमुख होते.

31इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते:

32बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

33बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

34योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.

35हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

36हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.

37सामलाह मेल्यावर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातील शौल त्याच्या जागी राजा झाला.

38शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.

39अकबोराचा पुत्र बआल-हानान हा मेल्यावर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते, आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेद हिची कन्या होती.

40एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता: तिम्ना, आल्वा, यतेथ,

41ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,

42केनाज, तेमान, मिब्सार,

43मग्दीएल व ईराम. हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी बनले. त्यांनी ज्या जागेचा ताबा घेतला होता त्याप्रमाणे. हा सर्व एदोमाचा पिता एसावाचा वंश आहे.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath