3 योहान 1
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1मंडळीचा वडील याजकडून, माझ्या प्रिय मित्र गायसला, ज्याच्यावर मी खरेपणाने प्रीती करतो.
2प्रिय मित्रा, मी प्रार्थना करतो की, तुला चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्याबरोबर सर्वकाही चांगले होत जावो, जशी तुझ्या आत्म्याचीसुद्धा उन्नती होत आहे.
3जेव्हा काही विश्वासणार्यांनी येऊन सत्यासाठी असलेल्या तुमच्या विश्वासूपणाबद्दल साक्ष दिली आणि सांगितले की तुम्ही सातत्याने विश्वासात कशाप्रकारे जगत आहात, तेव्हा मला मोठा आनंद झाला.
4माझी मुले सत्याने चालतात, हे ऐकल्याने मला जेवढा आनंद होतो, तेवढा आनंद दुसर्या कशानेही होत नाही.
5प्रिय मित्रा, जे तुला अनोळखी आहेत, त्या काही भावांसाठी आणि बहिणींसाठी तू जे करीत आहेस त्यामध्ये तू विश्वासू आहेस.
6त्यांनी मंडळीला तू दाखविलेल्या प्रीतीविषयी साक्ष दिली आहे. कृपा करून त्यांना अशाप्रकारे निरोप देऊन पाठव की ज्यामुळे परमेश्वराचे गौरव व्हावे.
7ते गैरयहूदी लोकांकडून कोणतीही मदत न घेता सेवेसाठी बाहेर निघाले हे परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठीच होते.
8आपण अशा लोकांचे आदरातिथ्य केले पाहिजे, म्हणजे सत्यासाठी आपण एकत्र कार्य करू शकू.
9मी मंडळीला एक पत्र लिहिले, परंतु दियत्रेफस, जो स्वतःस श्रेष्ठ करण्याची आवडत धरतो, तो आमचे स्वागत करणार नाही.
10म्हणून जेव्हा मी येईन, तेव्हा तो आमच्याविषयी द्वेषभावनेने निरर्थक बातम्या पसरवित आहे याकडे लक्ष वेधीन. एवढेच नव्हे तर तो इतर विश्वासणार्यांचेही स्वागत करीत नाही. पण जे कोणी करू इच्छितात त्यांना तो मनाई करतो आणि मंडळीतून घालवून देतो.
11प्रिय मित्रा, जे वाईट आहे त्याचे अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर. जो कोणी चांगले करतो तो परमेश्वरापासून आहे. जो कोणी जे काही वाईट आहे ते करतो त्याने परमेश्वराला पाहिलेले नाही.
12देमेत्रियाबद्दल प्रत्येकजण चांगले बोलतात आणि स्वतः सत्यसुद्धा त्याच्याविषयी साक्ष देते. आम्हीसुद्धा त्याच्याविषयी चांगलेच बोलतो आणि तुम्हाला माहीतच आहे की, आमची साक्ष खरी आहे.
13तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते लेखणी आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही.
14तुमची भेट लवकरच होईल, अशी मला आशा आहे आणि तेव्हा आपण समोरासमोर बोलू.
15तुम्हाला शांती लाभो. येथील मित्र तुम्हाला शुभेच्छा पाठवितात. कृपया तेथील मित्रांपैकी प्रत्येकाला त्यांच्या नावाने शुभेच्छा दे.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath