ख्रिश्चन धर्म
मागे

2 राजे 18

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1इस्राएलचा राजा, एलाहचा पुत्र होशेच्या तिसर्‍या वर्षी, यहूदीयाचा राजा आहाजाचा पुत्र हिज्कीयाह राज्य करू लागला.

2हिज्कीयाह पंचवीस वर्षाचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीयाह, ती जखर्‍याहची कन्या होती.

3त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

4त्याने उच्च स्थाने काढून टाकली, पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्याने मोशेने तयार केलेला कास्याच्या सापाचे तुकडे केले, कारण तोपर्यंत इस्राएली लोक त्याच्यापुढे धूप जाळत होते. (त्याला नहुशतान असे म्हणत होते.)

5हिज्कीयाहचा याहवेह इस्राएलांच्या परमेश्वरावर भरवसा होता. म्हणून यहूदीयाच्या सर्व राजांमध्ये त्याच्यासारखा कोणीही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर झाला नाही.

6तो याहवेहला धरून राहिला आणि त्यांचे अनुसरण करण्यापासून मागे फिरला नाही; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे तो पालन करीत राहिला.

7आणि याहवेह त्याच्याबरोबर होते; त्याने जे काही हाती घेतले त्यात तो यशस्वी झाला. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची सेवा केली नाही.

8त्याने गाझा आणि त्याच्या सीमेपर्यंत पलिष्ट्यांना पराभूत केले, त्याने पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तटबंदीच्या नगरापर्यंत त्यांना मारले.

9हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.

10तिसर्‍या वर्षांच्या शेवटी अश्शूरच्या लोकांनी ते घेतले. शोमरोन हे हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी आणि इस्राएलचा राजा होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी ताब्यात घेण्यात आले.

11मग अश्शूरच्या राजाने इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये नेले व त्यांना हलह येथे, गोजानातील हाबोर नदीकिनारी व मेदिया लोकांच्या नगरात ठेवले.

12हे अशासाठी झाले कारण त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराची आज्ञा पाळली नाही व त्यांचा करार मोडला; याहवेहचा सेवक मोशेने जे सर्व आज्ञापिले होते, ते त्यांनी ऐकले नाही किंवा त्याचे पालन केले नाही.

13हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या नगरांवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली

14म्हणून यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने लाखीश येथे अश्शूरच्या राजाला हा संदेश पाठविला: “माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्यापासून परत जा, आणि तुम्ही जी काही खंडणी मागाल ती मी देईल.” अश्शूरच्या राजाने तडजोडीसाठी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहकडून चांदीचे तीनशे तालांत आणि सोन्याचे तीस तालांत यांची मागणी केली.

15तेव्हा हिज्कीयाह राजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील तिजोरीत असलेली सर्व चांदी त्याला दिली.

16यावेळी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिराची दारे व खांबावर मढविलेले सोने काढले व ते अश्शूरच्या राजाला दिले.

17अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले.

18त्यांनी राजाला बोलाविले; तेव्हा त्याच्या राजवाड्याचा कारभारी एल्याकीम जो हिल्कियाहचा पुत्र, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र होता हे त्याच्याकडे गेले.

19तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस?

20तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस?

21पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.

22पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही यरुशलेममधील याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय”?

23“ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: तुमच्याकडे दोन हजार घोडेस्वार जरी असले तरी मी तुला दोन हजार घोडे देईन!

24रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्‍यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार?

25शिवाय, मी याहवेहशिवाय या ठिकाणावर हल्ला करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आलो आहे काय? याहवेहने स्वतःच मला या देशावर हल्ला करण्यास आणि त्याचा नाश करण्यास सांगितले आहे.’ ”

26तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम, शेबना आणि योवाह हे सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.”

27परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगावयास पाठविले होते, ते काय फक्त तुमच्या धन्याला आणि तुम्हाला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुमच्यासारखीच स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?”

28मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरच्या राजाचे ऐका!

29राजा असे म्हणतात: हिज्कीयाहस तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.

30‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवतील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’ असे म्हणून हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका.

31“हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे राजा असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल,

32जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या, जैतून तेलाची झाडे आणि मधाच्या देशात नेत नाही तोपर्यंत. जीवन निवडा, मृत्यू नव्हे! “हिज्कीयाहचे ऐकू नका, कारण ‘याहवेह आम्हाला सोडवतील’ असे सांगून तो तुमची दिशाभूल करीत आहे.

33कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?

34हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाहची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय?

35या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्याच्या देशाला माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?”

36परंतु लोक गप्प राहिले आणि उत्तर देण्यासाठी काहीच बोलले नाहीत, कारण राजाने आज्ञा केली होती, “त्याला उत्तर देऊ नका.”

37यानंतर हिल्कियाहचा पुत्र राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath