ख्रिश्चन धर्म
मागे

1 शमुवेल 5

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला.

2नंतर पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश दागोनच्या मंदिरात नेला आणि दागोनच्या मूर्तीच्या बाजूला ठेवला.

3जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्‍या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले.

4परंतु दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा ते उठले तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्याचे डोके आणि हात तुटून ते दाराच्या उंबरठ्यावर पडलेले होते; फक्त त्याचे शरीर तसेच होते.

5त्यामुळेच आजपर्यंत दागोनचे पुजारी किंवा जे अश्दोद येथे दागोनच्या मंदिरात जातात ते उंबरठ्यावर पाय ठेवीत नाहीत.

6याहवेहचा हात अश्दोद व त्याच्या जवळच्या भागातील लोकांवर भारी होता; याहवेहने त्यांच्यावर विध्वंस आणला आणि त्यांना पीडेच्या गाठींनी पीडले.

7जे घडत होते ते अश्दोदच्या लोकांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश येथे आमच्यामध्ये असू नये, कारण त्यांचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोन याच्यावर भारी आहे.”

8तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” त्यांनी उत्तर दिले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश गथकडे घेऊन जा.” तेव्हा त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश तिथून हालविला.

9परंतु त्यांनी कोश हालविल्यानंतर, याहवेहचा हात त्या शहराच्या विरुद्ध उठला आणि ते फार घाबरून गेले. परमेश्वराने त्या शहरातील लहान मोठ्यांना पीडेच्या गाठींनी पीडले.

10म्हणून त्यांनी परमेश्वराचा कोश एक्रोन येथे पाठविला. परमेश्वराचा कोश एक्रोनमध्ये प्रवेश करताच एक्रोनचे लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “आम्हाला आणि आमच्या लोकांनी मारावे म्हणून त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश आमच्याकडे आणला आहे.”

11तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलाविले आणि म्हटले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश दूर पाठवून द्या; त्याच्या मूळ ठिकाणी त्याला जाऊ द्या, नाहीतर तो आम्हाला आणि आमच्या लोकांना जिवे मारेल.” कारण शहरात मृत्यूमुळे भय पसरले होते; परमेश्वराचा हात त्यावर फार भारी होता.

12जे मरण पावले नाही ते पीडेच्या गाठींनी पीडित झाले होते व त्या शहराचा आक्रोश स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचला.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath