1 शमुवेल 24
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आल्यानंतर शौलाला सांगण्यात आले, “दावीद एन-गेदीच्या वाळवंटात आहे.”
2तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्यांच्या खडकाळ भागात गेले.
3रस्त्याने फिरत तो मेंढवाड्याच्या जवळ आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दिशेस गेला, दावीद आणि त्याची माणसेही त्या गुहेत अगदी लांब आतील बाजूस होती.
4दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला.
5त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले.
6तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.”
7या शब्दांनी दावीदाने त्याच्या माणसांचा कडकपणे निषेध केला आणि शौलावर हल्ला करण्यास आवरले. तेव्हा शौल गुहेतून बाहेर निघून आपल्या मार्गाने गेला.
8नंतर दावीद गुहेच्या बाहेर आला आणि शौलाला हाक मारली, “महाराज, माझ्या धन्या!” जेव्हा शौलाने मागे पाहिले, तेव्हा दावीदाने भूमीकडे आपले तोंड करून दंडवत घातले.
9तो शौलाला म्हणाला, “तुम्ही लोकांचे का ऐकता, जेव्हा ते म्हणतात, ‘दावीद तुला इजा करण्यास पाहत आहे’?
10आज तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, कशाप्रकारे याहवेहने गुहेमध्ये तुम्हाला माझ्या हाती दिले होते. तुम्हाला मारून टाकावे असे काहीजण म्हणाले, परंतु मी तुम्हाला सोडले; मी म्हणालो, ‘मी माझ्या धन्यावर हात टाकणार नाही, कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.’
11पाहा, माझ्या पित्या, तुमच्या झग्याचा तुकडा माझ्या हातात आहे तो पाहा! मी तुमच्या झग्याचा काठ कापून घेतला परंतु तुम्हाला मारून टाकले नाही. यावरून माझ्याकडे दुष्ट किंवा फितुरी असल्याचा दोष नाही. मी तुमच्याशी चुकीचे वागलो नाही, तरीही तुम्ही माझ्या जिवाची शिकार करण्यास टपला आहात.
12याहवेह तुमच्या आणि माझ्यामध्ये न्याय करो. तुम्ही माझ्याबरोबर जे चुकीचे केले आहे त्याचा बदला याहवेहच घेवो, परंतु मी तुम्हाला हात लावणार नाही.
13जशी प्राचीन काळाची म्हण ‘दुष्टापासून दुष्टाई येते,’ म्हणून माझा हात तुम्हाला स्पर्श करणार नाही.
14“इस्राएलचा राजा कोणाविरुद्ध बाहेर आला आहे? तुम्ही कोणाचा पाठलाग करीत आहात? एका मेलेल्या कुत्र्याचा? एखाद्या पिसवाचा?
15याहवेहनेच आपला न्यायाधीश होऊन आपल्यामध्ये निवाडा करावा. त्यांनी माझा वाद लक्षात घेऊन माझा कैवार घ्यावा; व मला तुमच्या हातून सोडवून माझी सुटका करावी.”
16जेव्हा दावीदाने त्याचे हे बोलणे संपविले तेव्हा शौलाने विचारले, “दावीदा, माझ्या पुत्रा, हा तुझाच आवाज आहे काय?” आणि शौल मोठ्याने रडला,
17तो दावीदाला म्हणाला, “तू माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहेस, तू माझ्याशी सदाचाराने वागलास, परंतु मी तुझ्याशी वाईट वागलो.
18तू माझ्याशी चांगले वागतोस ते तू आताच मला दाखवून दिले आहेस; याहवेहने मला तुझ्या हाती दिले होते, परंतु तू मला मारून टाकले नाहीस.
19कोणा मनुष्याला त्याचा शत्रू सापडला तेव्हा त्याला इजा केल्याशिवाय जाऊ देईल काय? ज्याप्रकारे तू आज माझ्याशी वागलास त्याचे चांगले प्रतिफळ याहवेह तुला देवो.
20मला माहीत आहे की, तू खरोखर राजा होशील आणि इस्राएलचे राज्य तुझ्या हातात स्थापित होईल.
21तेव्हा आता मला याहवेहची शपथ घेऊन सांग की, माझ्या वंशजांचा तू नाश करणार नाहीस किंवा माझ्या पित्याच्या घराण्यातून माझे नाव पुसून टाकणार नाहीस.”
22तेव्हा दावीदाने शौलास शपथेने वचन दिले; नंतर शौल घरी गेला, परंतु दावीद आणि त्याची माणसे गडाकडे गेली.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath