1 योहान 5
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1येशू हे ख्रिस्त आहेत, असा विश्वास ठेवणारा प्रत्येकजण परमेश्वरापासून जन्मला आहे आणि प्रत्येकजण जे पित्यावर प्रीती करतात ते त्यांच्या लेकरावरही प्रीती करतात.
2आपण परमेश्वराच्या मुलांवर प्रीती करतो हे यावरून आपणास समजतेः परमेश्वरावर प्रीती करावी व त्यांच्या आज्ञांचे पालन करावे.
3परमेश्वराच्या आज्ञा पाळणे म्हणजे त्यांच्यावर प्रीती करणे होय आणि त्यांच्या आज्ञा जाचक नाहीत
4कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे.
5जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहेत जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात.
6पाणी आणि रक्त यांच्याद्वारे जे आले तेच येशू ख्रिस्त आहेत. ते केवळ पाण्याच्याद्वारे आले नाहीत, परंतु पाण्याच्या आणि रक्ताच्याद्वारे आले. जो साक्ष देतो तो परमेश्वराचा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे.
7याबद्दल तिघे जण साक्ष देतात:
8आत्मा, पाणी आणि रक्त या तिघांमध्ये एकमत आहे.
9आपण मनुष्यांची साक्ष स्वीकारतो, परंतु परमेश्वराची साक्ष सर्वात महान आहे, कारण ती परमेश्वराने दिलेली साक्ष आहे जी त्यांनी त्यांच्या पुत्राबद्दल दिली आहे.
10जे कोणी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतात ते ही साक्ष स्वीकारतात. जे कोणी यावर विश्वास ठेवीत नाहीत, परमेश्वराने त्यांना लबाड ठरविले आहे, कारण परमेश्वराने त्यांच्या पुत्राविषयी दिलेल्या साक्षीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही;
11हीच ती साक्ष आहे: परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्यांच्या पुत्रामध्ये आहे.
12ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही.
13मी तुम्हाला हे लिहित आहे यासाठी की, तुम्ही जे परमेश्वराच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवता त्या तुम्हाला हे माहीत असावे की, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळालेले आहे.
14आपल्याला परमेश्वराच्या समक्षतेत येण्यासाठी आत्मविश्वास आहे, कारण आपण त्यांच्या इच्छेनुसार काही मागितले तर ते आमचे ऐकतात.
15जे आपण मागतो ते ऐकतात आणि आपल्याला माहीत आहे की जे आपण त्यांना मागितले आहे ते आपणास मिळाले आहे.
16ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.
17प्रत्येक चुकीचे कृत्य पाप आहे आणि असेही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही.
18आपल्याला माहीत आहे की, जे कोणी परमेश्वरापासून जन्मले आहेत ते पाप करीत राहत नाहीत; जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांना परमेश्वर सुरक्षित ठेवतात आणि तो दुष्ट त्यांना अपाय करू शकत नाही.
19आपल्याला हे माहीत आहे की, आपण परमेश्वराची लेकरे आहोत आणि संपूर्ण जग त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
20आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की, परमेश्वराचे पुत्र ख्रिस्त आले आहेत आणि आपण खर्या परमेश्वराला ओळखावे यासाठी त्यांनी आपल्याला बुद्धी दिली आहे. त्यांचे पुत्र येशू ख्रिस्तामध्ये असल्याने, जे खरे आहेत त्यांच्यामध्ये आपण आहोत. तेच एकमेव खरे परमेश्वर आहेत आणि तेच सार्वकालिक जीवन आहेत.
21प्रिय लेकरांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर ठेवा.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath