ख्रिश्चन धर्म
मागे

1 इतिहास 6

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

2कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.

3अम्रामाची संतती: अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र: नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.

4एलअज़ारास फिनहास, फिनहासास अबीशूवा,

5अबीशूवास बुक्की, बुक्कीस उज्जी,

6उज्जीस जरह्याह, जरह्याहास मरायोथ,

7मरायोथास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब,

8अहीतूबास सादोक, सादोकास अहीमाज,

9अहीमाजास अजर्‍याह, अजर्‍याहास योहानान,

10योहानान यास अजर्‍याह झाला. अजर्‍याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.

11अजर्‍याहास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब झाला,

12अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम,

13शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,

14अजर्‍याहास सरायाह, सेरायाहास यहोसादाक झाला.

15याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.

16लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.

17ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे: लिब्नी व शिमी.

18कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.

19मरारीचे पुत्र: महली व मूशी. त्यांच्या पूर्वजांप्रमाणे नोंदवलेली लेव्यांची कुळे:

20गेर्षोमाच्या कुळातील: गेर्षोमचा पुत्र लिब्नी, लिब्नीचा पुत्र यहथ, यहथाचा पुत्र जिम्माह,

21जिम्माहाचा पुत्र योवाह, योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, जेरहचा पुत्र जेथेराय.

22कोहाथाचे वंशज: कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह, कोरहाचा पुत्र अस्सीर,

23अस्सीरचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफाचा पुत्र अस्सीर,

24अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल, उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल.

25एलकानाहचे वंशज: अमासय व अहीमोथ.

26एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ, नहाथाचा पुत्र एलियाब,

27एलियाबाचा पुत्र, यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र शमुवेल.

28शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.

29मरारीचे वंशज: महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जाह,

30त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह व त्याचा पुत्र असायाह.

31कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:

32यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत.

33ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,

34जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र, जो एलीएलचा पुत्र, जो तोहाचा पुत्र,

35जो सूफाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो महथचा पुत्र, जो अमासयचा पुत्र,

36जो एलकानाहचा पुत्र, जो योएलचा पुत्र, जो अजर्‍याहाचा पुत्र, जो सफन्याहाचा पुत्र,

37जो तहथाचा पुत्र, जो अस्सीरचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहाचा पुत्र,

38जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र.

39हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र,

40जो मिखाएलचा पुत्र, जो बासेयाहचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,

41जो एथनीचा पुत्र, जो जेरहचा पुत्र, जो अदायाहचा पुत्र,

42जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, जो शिमीचा पुत्र,

43जो यहथाचा पुत्र, जो गेर्षोमचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र,

44आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, जो मल्लूखचा पुत्र,

45जो हशब्याहाचा पुत्र, जो अमस्याहाचा पुत्र, जो हिल्कियाहचा पुत्र,

46जो अमसीचा पुत्र, जो बानीचा पुत्र, जो शेमेरचा पुत्र,

47जो महलीचा पुत्र, जो मूशीचा पुत्र, जो मरारीचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र.

48त्यांच्या लेवी भाऊबंदांना परमेश्वराच्या भवनाच्या निवासमंडपातील सर्व सेवेसाठी समर्पित करण्यात आलेले होते.

49अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत.

50अहरोनाचे वंशज: अहरोनाचा पुत्र एलअज़ार, त्याचा पुत्र फिनहास, त्याचा पुत्र अबीशूवा,

51त्याचा पुत्र बुक्की, त्याचा पुत्र उज्जी, त्याचा पुत्र जरह्याह,

52त्याचा पुत्र मरायोथ, त्याचा पुत्र अमर्‍याह, त्याचा पुत्र अहीतूब,

53त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहीमाज.

54हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती):

55यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले.

56पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली.

57अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,

58हीलेन, दबीर,

59आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह.

60बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह. त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती.

61अवशिष्ट राहिलेल्या कोहाथी वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेहच्या अर्ध्या वंशजाच्या प्रदेशातून दहा नगरे दिली.

62गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली.

63मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली.

64इस्राएली लोकांनी लेवी वंशजास ही नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली.

65त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली.

66एफ्राईम वंशजाने कोहाथ पितृकुळाला जी नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली ती ही:

67एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,

68योकमेअम, बेथ-होरोन,

69अय्यालोन, गथ-रिम्मोन हे सर्व त्यांच्या शिवारासह.

70तसेच मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून आनेर आणि बिलाम, त्यांच्या शिवारासह. ही कोहाथी पितृकुळातील अवशिष्ट वंशजास दिली.

71गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून बाशानातले गोलान व अष्टारोथ त्यांच्या शिवारासह;

72इस्साखारच्या गोत्रातून केदेश व दाबरथ,

73रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली;

74आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,

75हुक्कोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;

76नफताली गोत्रातून गालीलातील केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.

77लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह;

78यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार,

79केदेमोथ व त्याचे शिवार आणि मेफाथ व त्याचे शिवार ही दिली;

80आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,

81हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath