1 इतिहास 20
तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे
1त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला.
2दावीद तिथे पोहोचला, तेव्हा त्याने राब्बाहचा राजा मिलकोम च्या डोक्यावरील मुकुट काढला—तो मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सोन्याचा एक तालांत होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती; तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्याने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली.
3आणि त्या शहरातील रहिवाशांना त्याने बाहेर आणले व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयाला लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या सर्व नगरांचे असेच केले. नंतर दावीद व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.
4कालांतराने, पलिष्ट्यांबरोबर गेजेर येथे युद्ध झाले, सिब्बखय नावाच्या हुशाथी मनुष्याने रेफाईमच्या वंशातील सिप्पय नावाच्या एका मनुष्याला ठार मारले, तेव्हा पलिष्टी शरण आले.
5पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धात याईराचा पुत्र एलहानानने लहमी या गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले, ज्याच्या भाल्याची काठी विणकर्याच्या काठीसारखी होती.
6आणखी गथ येथे झालेल्या दुसर्या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता.
7जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले.
8हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.
WEBREATH · 11:11
«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25
Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.
WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath