ख्रिश्चन धर्म
मागे

1 इतिहास 17

तुमच्या भाषेत अद्याप कोणतेही भाषांतर नाही — इंग्रजी दाखवत आहे

1जेव्हा दावीद आपल्या राजवाड्यात राहत असताना, त्याने नाथान संदेष्ट्यास म्हटले, “पाहा, येथे मी गंधसरूच्या भवनात राहतो, परंतु याहवेहच्या कराराचा कोश एका तंबूत आहे!”

2नाथानाने दावीदाला उत्तर दिले, “आपल्या मनात जे काही आहे त्यानुसार करा, कारण परमेश्वर आपल्याबरोबर आहेत.”

3परंतु त्याच रात्री परमेश्वराचे वचन असे नाथानाकडे आले:

4“जा आणि माझा सेवक दावीदला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी तू घर बांधणार नाहीस.

5इस्राएली लोकांना इजिप्त देशातून मी बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत मी घरात राहिलो नाही, तंबू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणात, या निवासस्थानातून त्या निवासस्थानात फिरत राहिलो आहे.

6जिथे कुठे मी इस्राएली लोकांबरोबर फिरत आलो, तेव्हा त्यांच्यातील ज्यांना मी माझ्या लोकांची मेंढपाळाप्रमाणे काळजी घेण्यास आज्ञा दिली त्यातील कोणत्याही पुढार्‍यांना, “तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे भवन का बांधले नाही असे कधी मी म्हटले काय?” ’

7“तर आता माझा सेवक दावीद याला सांग, ‘सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: मी तुला कुरणातून, कळप राखीत असताना आणले आणि माझ्या इस्राएली लोकांवर अधिपती म्हणून नेमले.

8जिथे कुठे तू गेलास तिथे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्यापुढून छेदून टाकले. आता मी, पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ पुरुषांच्या नावांप्रमाणे तुझे नाव करेन.

9आणि मी माझ्या इस्राएली लोकांसाठी एक ठिकाण नेमून देईन आणि त्यांना त्या ठिकाणी स्थापित करेन, यासाठी की त्यांना आपले स्वतःचे घर असावे आणि त्यांना पुन्हा त्रास होऊ नये. आणि पूर्वीप्रमाणे दुष्ट लोकांनी त्यांचा छळ करू नये.

10मी माझ्या इस्राएली लोकांवर पुढारी नेमले तेव्हापासून असेच घडले. मी तुझ्या सर्व शत्रूंचा ताबा घेईन. “ ‘मी असे जाहीर करतो की याहवेह तुझ्यासाठी एक घर बांधतील:

11जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, तेव्हा मी तुझे संतान, तुझ्या पुत्रांपैकी एक उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य स्थापित करेन.

12तोच माझ्यासाठी घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.

13मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल; ज्याप्रकारे मी तुझ्या पूर्वजापासून काढून घेतले होते तसे मी माझे प्रेम कधीही त्याच्यापासून काढून घेणार नाही.

14मी त्याला माझ्या मंदिरावर आणि माझ्या राज्यावर नेमीन; त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”

15या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला.

16तेव्हा दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाला: “हे याहवेह परमेश्वरा, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की, तुम्ही मला येथवर आणावे?

17माझ्या परमेश्वरा, तुमच्या दृष्टीने हे जणू पुरेसे नव्हते, तर तुम्ही माझ्या कुटुंबाच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे. याहवेह परमेश्वरा, मी जणूकाही कोणीतरी फार श्रेष्ठ दर्जाचा आहे, अशा नजरेने तुम्ही माझ्याकडे बघितले आहे.

18“तुम्ही दावीद या आपल्या सेवकाला मोठा सन्मान दिला आहे, तर मी पुढे काय बोलू? आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.

19हे याहवेह, तुम्ही आपल्या सेवकासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे हे सर्व महान कार्य केले आहे आणि थोर अभिवचन दिले आहे.

20“हे याहवेह, तुमच्यासारखे कोणी परमेश्वर नाही. जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार तुमच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही.

21आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहे; पृथ्वीवरील असे एक राष्ट्र, ज्यांच्या परमेश्वरांनी बाहेर जाऊन स्वतःसाठी व तुमच्या नावासाठी इजिप्तमधून त्यांना खंडून घेतले, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले?

22तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना सर्वकाळासाठी तुमचे स्वतःचे खास लोक बनविले आहे आणि हे याहवेह तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात.

23“तर आता, हे याहवेह, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळासाठी स्थापित करावे. आपण म्हटल्याप्रमाणे ते आपण करावे.

24यासाठी की ते स्थापित व्हावे आणि तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलवर राज्य करणारे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीदाचे घराणे तुमच्यासमोर स्थापित व्हावे.

25“हे माझ्या परमेश्वरा, तुम्ही तुमच्या सेवकास प्रकट केले आहे, की तुम्ही त्याच्यासाठी एक घर बांधाल. त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे.

26याहवेह, परमेश्वर तुम्हीच आहात! तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे.

27आता आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद देण्यास तुम्ही प्रसन्न आहात, म्हणजे ते तुमच्या दृष्टीत सदैव राहावे; कारण हे याहवेह, तुम्ही ते आशीर्वादित केले आहे, आणि ते सदैव आशीर्वादित व्हावे.”

स्रोत: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

WEBREATH · 11:11

«He himself gives everyone life and breath and everything else» — Acts 17:25

Breath is one for all: everyone lives by it, whoever they are and whatever they believe. Every day at 11:11 local time people stop for sixty seconds, breathe, and thank GOD for the breath — each in their own words, each within themselves. In that minute we are One Breath.

WEBREATH — the Minute at 11:11, your own local time — we are One Breath